शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: December 2, 2014 00:15 IST

शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटणार

कोल्हापूर : दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंगमध्ये चोरी केलेले सोने जिल्ह्यातील काही सराफ विकत घेऊन कोट्यवधी रुपये कमवित असताना पोलीस मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत. गुन्हेगारांशी लागेबांधे असणाऱ्या सराफांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे शिष्टमंडळासह उद्या, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंगसारख्या गंभीर घटना घडत आहेत. दरोडेखोर चोरी केलेले सोने जिल्ह्णातीलच सराफाला विकून त्यामधून पैसे कमवित आहेत. पोलीस मात्र चोरट्यांच्या शोधासाठी वेळ, पैसा खर्च करीत आहे. सराफ चोरट्यांकडून कमी भावात सोने खरेदी करून तो मार्केटमध्ये बाजारभावाप्रमाणे विकून कोट्यवधी रुपये कमवित आहे. अनेक सराफांचे चोरट्यांशी लागेबांधे असून, त्यांची ही एक साखळीच आहे. चोरट्यांवर गुन्हे दाखल होतात. पण सराफावर मात्र गुन्हे दाखल करण्यात पोलीस कुचराई करतात. चोरीचे दागिने विकत घेणे हा देखील गुन्हाच असताना त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही. पोलिसांनी दरोडेखोरांपाठोपाठ चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख पवार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)