कोथळीत दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:17+5:302021-02-05T06:53:17+5:30

जयसिंगपूर : घरासमोर लावण्यात आलेल्या चारचाकी वाहनावरून कोथळी (ता. शिरोळ) येथे दोन गटात हाणामारीची घटना घडली. यात प्लॅस्टिकची पाईप, ...

Fighting in two groups in Kothali | कोथळीत दोन गटात हाणामारी

कोथळीत दोन गटात हाणामारी

जयसिंगपूर : घरासमोर लावण्यात आलेल्या चारचाकी वाहनावरून कोथळी (ता. शिरोळ) येथे दोन गटात हाणामारीची घटना घडली. यात प्लॅस्टिकची पाईप, काठ्या, विटांचा वापर झाल्याचे सहाजण जखमी झाले. जयसिंगपूर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून ५० जणांवर जातिवाचक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, जनाबाई नंदीवाले यांच्या घरासमोर सिध्देश्वर हेगडे यांनी चारचाकी वाहन लावले होते. गाडी लावायची नाही, यावरुन वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. जातिवाचक शिवीगाळप्रकरणी जनाबाई नंदीवाले, शिवा नंदीवाले, पांडुरंग नंदीवाले, मुत्ताप्पा नंदीवाले, आण्णाप्पा नंदीवाले, सूरज नंदीवाले (सर्व रा. लक्ष्मीनगर कोथळी) यांच्यासह अन्य ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर अन्य महिलेच्या तक्रारीनुसार सिध्देश्वर दगडू हेगडे, पवित्रा हेगडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fighting in two groups in Kothali