याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागला असून विजयी उमेदवारांनी काढलेल्या विजयी रॅलीचे मोबाइलवरील चित्रीकरण पाहण्यावरून दोन युवकांमध्ये दोन दिवसापूर्वी किरकोळ मारामारी झाली होती. त्यावेळी गावातील ज्येष्ठांनी पडदा टाकला होता. मात्र आज सकाळी जखमी झालेला तरुण बाहेर गावी जात असताना त्याच्यावर पाळत ठेवून दुसऱ्या तरुणाने काठीने जोरदार मारहाण केली. त्यामुळे डोक्यात वर्मी घाव बसल्याने संबंधित तरुण जागेवरच बेशुद्ध पडला. नातेवाइकांनी त्यास कोल्हापूर येथील सीपीआर येथे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे.
गवशी येथे निवडणूक वादातून मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST
याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागला असून विजयी उमेदवारांनी काढलेल्या विजयी रॅलीचे ...
गवशी येथे निवडणूक वादातून मारामारी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}