पन्हाळा : धबधबेवाडी (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटांतील वादामुळे झालेल्या मारामारीत पोलीस हवालदार जखमी झाल्याने दोन्ही गटांच्या दहाजणांवर पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या मारामारीतील आरोपी संजय दिनकर पोवार, जयसिंग भिकाजी खोपकर, सुजित वसंत खोपकर, तानाजी आनंदा खोपकर, ओंकार राजाराम खोपकर, राहुल आनंदा पाटील व नंदकुमार दत्तू कांबळे या सात जणांना अटक केली. त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. या मारामारीतील निवृत्त पोलीस कर्मचारी हिंदुराव लक्ष्मण पाटील यास अटक केली असता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उर्वरित सतीश अंकुश खोपकर व अभीमन्यू भीमराव प हे दोघेजण अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जखमी पोलीस कॉन्स्टेबल मारुती महिपती पाटील यांनी पन्हाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धबधबेवाडी (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. निकालानंतर विजयी उमेदवारांनी काढलेली मिरवणूक पराभूत उमेदवाराच्या घरासमोरून जात असताना वादावादीला सुरुवात झाली. त्याचे रूपांतर मोठ्या वादात होऊ लागले होते. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून बंदोबस्तास असलेले पोलीस मारुती पाटील तेथे गेले व वाद थांबविण्याचा व जमाव पांगविण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच वेळी फरार आरोपी सतीश अंकुश खोपकर याने पोलीस हवालदार पाटील यांच्या डोक्यात काठी मारून त्यांना जखमी केले. जखमी पोलीस कॉन्स्टेबल मारुती महिपती पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मिरवणुकीत दोन गटांत मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST
पन्हाळा : धबधबेवाडी (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या ...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मिरवणुकीत दोन गटांत मारामारी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}