पाचगावात शेजाऱ्याच्या मारहाणीत युवक जखमी

By Admin | Updated: August 22, 2015 00:54 IST2015-08-22T00:54:34+5:302015-08-22T00:54:34+5:30

‘कपडे घालून या’ असे सांगितल्याच्या रागातून काठीने हल्ला

In the fifth house, the injured youth were injured | पाचगावात शेजाऱ्याच्या मारहाणीत युवक जखमी

पाचगावात शेजाऱ्याच्या मारहाणीत युवक जखमी

कोल्हापूर : ‘कपडे घालून या’ असे सांगितल्याच्या रागातून पाचगाव (ता. करवीर) येथील नीलेश दगडू टिपुगडे (वय २३) यांच्यावर शेजारी राहणाऱ्या दत्तात्रय सोनवणे (३८) याने काठीने हल्ला करीत जखमी केले. जखमी नीलेश यास उपचारासाठी नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
पाचगाव येथील पाचगाव विद्यामंदिरजवळ नीलेश यांचे केश कर्तनालयाचे दुकान आहे. त्याच्या शेजारीच दत्तात्रय सोनवणे याचेही चिकन व सायकल दुकान आहे. शुक्रवारी दुपारी दत्तात्रय हा बर्मुडा चड्डी व बनियानवर नीलेशच्या दुकानात दारू पिऊ न आला. यावेळी नीलेशने त्यास गिऱ्हाईक आहे, तू कपडे घालून ये, असे सांगितले. कपडे घालून ये असे सांगितल्याच्या रागातून दत्तात्रयने पुन्हा बाहेर जाऊन काठी आणली. यावेळी झालेल्या वादावादीत दत्तात्रयने नीलेश यास काठीने डोक्यात प्रहार करीत जखमी केले. डोक्यास मार लागल्याने नीलेश डोक्यास हात लावून दुकानाबाहेर आला. यावेळी तेथून दत्तात्रय बाहेर निघून गेला. जखमी नीलेश यास त्याच्या नातेवाईक व मित्रांनी पाचच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
 

Web Title: In the fifth house, the injured youth were injured