शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी गुंतवणुकीमुळे उद्योगांना चालना

By admin | Updated: July 10, 2014 23:32 IST

कोल्हापुरातील उद्योजकांना विश्वास

कोल्हापूर : भारतीय बाजारपेठेत परदेशी गुंतवणुकीची गरज आहे. मोदी सरकारने या अर्थसंकल्पात गुंतवणुकीस वाव दिल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे यांनी आज, गुरुवारी येथे व्यक्त केला. कॉन्फिडरेशियन इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय)च्या पश्चिम महाराष्ट्र शाखेतर्फे हॉटेल पॅव्हेलियन येथे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ककडे म्हणाले, गेल्या सरकारच्या काळातच परदेशी गुुंतवणुकीबाबत चर्चा सुरू होती, परंतु गोंधळाच्या वातावरणाबरोबरच संशयाचे धुके निर्माण झाल्याने त्याला विरोध झाला होता. या सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे धुके दूर केले आहे. या अर्थसंकल्पात शेतीसारख्या क्षेत्राकडे कमी लक्ष दिल्याचे दिसून आले. शेती विकासाला प्राधान्य देणे गरजेचे होते. शेतकऱ्यांना इतर क्षेत्रांप्रमाणे सुरक्षेसाठी शंभर टक्के विमा देण्याची आवश्यकता आहे. देशात सध्या ३० कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. ही संख्या येत्या पाच वर्षांत शून्यापर्यंत आणण्याचे आव्हान सरकारला आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) हे मॉडेल खरोखरंच तपासण्याची गरज आहे.‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, औद्योगिक क्षेत्र, पर्यटन व पायाभूत सुविधांसह कौशल्य विकास ही क्षेत्र येणाऱ्या काळात ‘ग्रोथ’मध्ये येणार आहेत. व्हिजन स्पष्ट असणारे व भारताला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबई-बंगलोर कॉरिडॉरबाबत या अर्थसंकल्पात चर्चा झाली आहे. त्यामध्ये या मार्गावरील २० इंडस्ट्रीयल पार्क विकसित केले जाणार आहेत.कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने म्हणाले, नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी देशाची औद्योगिक प्रगती थांबली आहे तिला चालना द्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यानुसार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सुरुवात तरी चांगली झाली आहे. त्याची फलनिष्पत्ती पाहण्यासाठी किमान एक वर्षाची तरी वाट पाहावी लागेल.‘गोशिमा’चे अध्यक्ष उदय दुधाणे म्हणाले, ५० हजार कोटींहून अधिक रुपये रस्ते व पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जाणार आहेत, असे या अर्थसंकल्पातून सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला नक्कीच चालना मिळणार आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र तेंडुलकर म्हणाले, हा अर्थसंकल्प योग्य दिशेने व सर्वसामान्यांचा विचार करून केलेला आहे. ‘सीआयआय’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन शिरगांवकर म्हणाले, रस्ते, नद्याजोड प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे देशातील उद्योगांना चालना मिळेल. गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिस टॅक्स वर्षाअखेरपर्यंत अंमलात आणला जाणार आहे. त्याचा उद्योगांना चांगला फायदा होणार आहे.उद्योजक रामप्रताप झंवर म्हणाले, काही प्रमाणात उद्योगांना चालना मिळणार आहे. इन्फ्रा स्ट्रक्चरमुळे उद्योग वाढेल. पण टॅक्सेसबाबतीत मोठे निर्णय झालेले नाहीत. यावेळी श्रीकांत दुधाणे, अतुल पाटील, मोहन कुशिरे, संजय जोशी, सुजितसिंग पवार, शिवराज जगदाळे, शिवाजीराव पोवार, शांताराम सुर्वे, प्रदीप कापडिया आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)