मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून वडिलांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:18+5:302021-06-02T04:20:18+5:30

शिरोळ : मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर वडिलांनी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रत्नकांत गुरुपाद हिरेमठ (वय ५८, ...

Father commits suicide out of frustration over son's death | मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून वडिलांची आत्महत्या

मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून वडिलांची आत्महत्या

शिरोळ : मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर वडिलांनी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रत्नकांत गुरुपाद हिरेमठ (वय ५८, रा. कुंभार गल्ली, बसस्थानकाजवळ, शिरोळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी सांगितले की, रत्नकांत यांचा मुलगा नागेश हिरेमठ यांचे आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मुलाच्या आकस्मिक मृत्यूने रत्नकांत यांनी नैराश्येतून राहत्या घरी माडीवरील स्लॅबच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी नरेंद्र हिरेमठ यांनी पोलिसांत दिली. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

चौकट -

कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

आठ दिवसांपूर्वी रत्नकांत यांचा मुलगा नागेश हिरेमठ याचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर वडील रत्नकांत यांनी मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून आत्महत्या केली. यामुळे आठ दिवसांत घरातील दोन पुरुषांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Father commits suicide out of frustration over son's death