शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या झटक्याने कोगे विभागातील शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 11:01 IST

mahavitaran Kolhapur- महावितरणच्या कोगे (ता. करवीर) उपविभागीय कार्यालयाच्या झटक्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. एकतर आठवड्यातून चार दिवसच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जातो. त्यातही तासभर अगोदर वीज गायब होत आहे. अगोदरच उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिके करपू लागली असताना महावितरणच्या करामतीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

ठळक मुद्देमहावितरणच्या झटक्याने कोगे विभागातील शेतकरी हैराण ठरवून दिलेल्या विजेच्या तासात अचानक कपात

कोल्हापूर : महावितरणच्या कोगे (ता. करवीर) उपविभागीय कार्यालयाच्या झटक्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. एकतर आठवड्यातून चार दिवसच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जातो. त्यातही तासभर अगोदर वीज गायब होत आहे. अगोदरच उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिके करपू लागली असताना महावितरणच्या करामतीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, ही गेली अनेक वर्षे मागणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे जोखमीचे ठरत आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीही महावितरण तीन दिवस रात्रीचा वीजपुरवठा करते.

दिवसा वीजपुरवठा करताना त्यातही कमी दाबाने पुरवठा करणे, मध्यंतरी वीज गायब होण्याच्या तक्रारी आहेत. कोगे महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शनिवारी सकाळी ८.२५ ते दुपारी ४.२५ पर्यंत शेती पंपांना वीजपुरवठा केला जातो. मुळात आठ तास वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे यामधील पाच-दहा मिनिटे वेळही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र, शनिवारी (दि. ६) निर्धारित वेळेच्या अगोदरच वीज बंद केली गेली. असे वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही तांत्रिक कारणामुळे तासभर अगोदर वीज बंद होत असेल तर दुसऱ्या दिवशी तेवढा कालावधी वाढवून देणे महावितरणास बंधनकारक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

महावितरणच्या कोगे कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेती पंपांबाबत असा प्रकार सातत्याने होत आहे. याची चौकशी होऊन शेतकऱ्यांना विनाखंडित वीजपुरवठा करावा.- संजय जोतिराम पाटील ,शेतकरी, वाकरे

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर