शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रनगरीच्या ‘कुंपणाने’च शेत खाल्ले!

By admin | Updated: September 13, 2014 00:34 IST

बांधलेल्या कंपौंडसाठी पुन्हा चार कोटींची निविदा : विकासात्मक विस्तार होणार तरी कधी?

इंदूमती गणेश ल्ल कोल्हापूरकोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला गतवैभव मिळवून देणारा आशेचा किरण असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीभोवती बांधण्यात आलेल्या कंपौंडवर पुन्हा एकदा चार कोटी १२ लाखांचा चुराडा करण्यात येणार आहे. चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या काळात तीन कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या कंपौंडसाठी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. एवढ्या रकमेत चित्रनगरीचे सगळे लोकेशन तयार होऊन चित्रीकरणाला प्रारंभ होईल. हे म्हणजे भूत बंगला झालेल्या इमारतीच्या टाळूवरचे लोणीच खाण्याचा प्रकार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे तत्कालिन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या काळात कोल्हापूर चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाने सन २०११-१२ साली दहा कोटींची तरतूद केली होती. चित्रनगरी विकसित झाल्यानंतर येथे चित्रीकरणासाठी अत्याधुनिक प्रकारचे कॅमेरे, लाईट्स असे चित्रीकरणाचे सामान आणले जाईल. या सामानांच्या सुरक्षिततेसाठी आणि चित्रनगरीची हद्द अबाधित राखण्यासाठी कंपौंड होणे गरजेचे होते. त्यानुसार एप्रिल-मे २०१२ साली चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसराची मोजणी करण्यात आली आणि लगेचच कंपौंडचे काम सुरूझाले. चित्रनगरीच्या ७७ एकर माळरानाभोवती दगडी कंपौंड करण्यात आले. सध्यस्थितीत कंपौंडचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. याच परिसरात कृत्रिम विहीरही करण्यात येणार असल्याने थोड्या परिसरात कंपौंड बांधलेले नाही, एवढेच काय ते उर्वरीत काम, असे असताना आज, शुक्रवारी पुन्हा व्यवस्थापकीय संचालक कोल्हापूर चित्रनगरीे यांच्यावतीने कंपौंडसाठी चार कोटी १२ लाख ६१ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात मौजे मोरेवाडी (ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर) येथील चित्रनगरीच्या जागेभोवती (सर्वे क्रमांक ६४ व ६५) संरक्षक भिंत बांधणे टप्पा-२ असे जाहीर करण्यात आले आहे. यासाठीच्या निविदा स्वीकारण्यची अंतिम तारीख १५ आॅक्टोबर देण्यात आली आहे. यामुळे चित्रनगरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, असे म्हणावे लागेल.