शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’च्या जयघोषात गणरायाला निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST

इचलकरंजी : ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...’ च्या जयघोषात इचलकरंजी शहरात ...

इचलकरंजी : ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...’ च्या जयघोषात इचलकरंजी शहरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. पालिकेने शहापूर खण व शहरातील विविध तीस ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी सोय केली होती. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार मूर्ती व निर्माल्य विसर्जनासाठी नागरिकांतून लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेचे पालन करून शहरात यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यानुसार नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करत नियोजित ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जित करून शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास सहकार्य केले. भक्तिमय वातावरणात शुक्रवारी (दि. १०) घरोघरी ‘श्रीं’ची स्थापना केली. मंगळवारी पाचव्यादिवशी गणपतीसह गौरीचे विसर्जन केले. सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते. सकाळच्या सुमारास विसर्जनासाठी अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, दुपारनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

नगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. कुंडात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती पालिकेच्यावतीने एकत्र करून शहापूर खणीमध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था केली होती. अप्पर तहसीलदार शरद पाटील, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, तलाठी स्वप्निल घाडगे यांनी शहापूर खणीची पाहणी केली. यावेळी पालिका व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

..........

पंचगंगा नदीकडे जाणारे सर्व मार्ग बंद

कोरोना महामारीमुळे प्रशासनाने नेमून दिलेल्या ठिकाणीच गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाने काही नागरिक पंचगंगा नदी घाटावर विसर्जनासाठी गर्दी करू नयेत यासाठी नदीकडे जाणाऱ्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच काही ठिकाणी पत्रे मारून मार्ग बंद केले होते.

फोटो ओळी

१४०९२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी कृत्रिम कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

१४०९२०२१-आयसीएच-०२

शहापूर खणीमध्ये बोटीतून विसर्जन करण्याची सुविधा करण्यात आली होती. नागरिकांनी त्यालाही प्रतिसाद दिला.

१४०९२०२१-आयसीएच-०३

शहापूर खणीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांना थेट प्रवेश नव्हता. त्यामुळे स्वयंसेवकांच्या ताब्यात मूर्ती देऊन भाविक विसर्जन पूर्ण होईपर्यंत दुरूनच दर्शनच घेत थांबले होते.

१४०९२०२१-आयसीएच-०४

पंचगंगा नदीघाटावर जाणाऱ्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जनासाठी मूर्ती घेऊन जाणाऱ्यांना अडवून कृत्रिम कुंडातच विसर्जन करायला लावण्यात येत होते.

सर्व छाया - उत्तम पाटील