शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

डोळं पुसावं की नाक झाकावं...

By admin | Updated: August 17, 2014 22:32 IST

मलकापूर : दुर्गंधीमुळे नातेवाइकांना भोगाव्या लागतात नरकयातना-स्मशानभूमीच्या मरणयातना...

माणिक डोंगरे - मलकापूर  -नवनवीन प्रकल्प यशस्वीपणे राबवणाऱ्या मलकापूर शहाराच्या स्मशानभूमीला मात्र कचरा डेपोमुळे दुर्गंधीचे ग्रहण लागले आहे़ स्मशानभूमीतच कचऱ्याचा डोंगर तयार झाल्यामुळे अंत्यविधीवेळी नातेवाइकांना तोंड बांधूनच अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नाही़मलकापूर शहराची सुमारे ३५ हजार लोकसंख्या आहे़ महामार्ग पूर्व व जुने गावठाण परिसरासाठी एकाच स्मशानभूमीचा वापर केला जातो़ आगाशिवनगर व शास्त्रीनगर पूर्व व पश्चिम भागाला कऱ्हाड शहराच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी चार किलोमीटर जावे लागते़ या दोन्ही विभागाची स्मशानभूमीची व्यथा अनेक वर्षांपासूनची आहे़ शहराचा प्रतिदिन किमान १० ते १२ टन कचरा गोळा होतो़ नगरपंचायतीने परिसरातील सर्व विहिरी मुजवून कचऱ्याची विल्हेवाट लावली़ दोन वर्षांपासून स्मशानभूमीलगतच्या मोकळ्या जागेतच कचरा टाकला जातो़ प्रतिदिन गोळा होणारा कचरा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कचऱ्याचा डोंगरच तयार झाला आहे़ ओला व सुका कचरा एकत्रच असल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे़ ७० टक्के नागरिक अंत्यविधीसाठी कऱ्हाड शहराच्या स्मशानभूमीत जातात. मात्र मलकापूर जुने गावठाण व महामार्गाच्या पूर्वेकडील नागरिकांना अशा जीवघेण्या घाणीतच अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नाही़ नगरपंचायतीच्या वतीने जुन्या स्मशानभूमीच्या पूर्वेस नवीन स्मशानभूमीचे काम हाती घेतले आहे़ ते काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे आणि दुर्गंधीच्या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़ माशांचा उपद्रव, आरोग्य धोक्यात परिसरात ओल्या कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होत आहे़ जुन्या गावठाणासह आसपासच्या कॉलन्यांमध्ये एखादे मोहोळ उठावे, असा माश्यांचा उपद्रव वाढला आहे़ यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ पन्नास कुत्र्यांचा कळप स्मशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाखाली सडके अन्न व मृत प्राणी असल्यामुळे ते खाण्यासाठी परिसरात ५० ते ६० कुत्र्यांचा कळपच वावरत असतो़ या कळपातील काही कुत्री हिंस्त्र बनली आहेत़ परिसरातून जाणाऱ्या लहान मुलांवर त्यांच्याकडून हल्ला केला जातो.