शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा तालुक्यातील डोंगररांगांना विदेशी वनस्पतींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST

या विदेशी वनस्पतींना पूरक पशुपक्षी व सूक्ष्मजीव आपल्याकडे नाहीत. या वनस्पती परदेशातील असून या झाडांवर पक्षी घरटे बांधत नाहीत. ...

या विदेशी वनस्पतींना पूरक पशुपक्षी व सूक्ष्मजीव आपल्याकडे नाहीत. या वनस्पती परदेशातील असून या झाडांवर पक्षी घरटे बांधत नाहीत. त्यांचा पाला, फळे खात नाहीत. या वृक्ष, वनस्पतींची पानझड झाल्यावर या वनस्पतींच्या खाली साधे गवतही उगवत नाही. झाडाचा पाला जामिनीवर साचून राहतो तो कुजतदेखील नाही. सध्या तर रानमोडी या परकीय झुडपाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचे उच्चाटन करण्याचे गरज आहे. परिणामी, डोंगरपठारांवर असणारे प्राणी मोठ्या प्रमाणात डोंगरातून शिवाराकडे स्थलांतर करतात. गिरिपुष्पसारख्या वनस्पतीमुळे स्थानिक असणाऱ्या वनस्पती त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. विदेशी वनस्पती शेजारी असणारी स्थानिक झाडे मृत होत आहेत. या वनस्पतीच्या फुलांच्या वासामुळे अनेक सरपटणारे प्राणी वस्तीत, शिवारात घुसत आहेत. या वनस्पतींच्या फुलांचा वास इतका उग्र असतो की पशुपक्षी फिरकत नाहीत. भविष्यात वृक्षलागवड करताना वन विभागाने सामाजिक वनविभागाने अभ्यास करून येथील जैवविविधतेला पूरक असणाऱ्या वड, पिंपळ, कडूलिंब, चिंच, आंबा, उंबर, बाभूळ या फळे-फुले येणाऱ्या वनस्पतींची लागवड करावी; जेणेकरून येथे सजीवसृष्टी समृद्ध होणार आहे.

अनेक डोंगरपठारांवर विदेशी झाडांची लागवड केल्यामुळे जैवविविधतेत मोठा थोका निर्माण झाला आहे. या विदेशी वनस्पतींवर पशुपक्षी बसत नाहीत, घरटे बांधत नाहीत. आपल्या भागातील जैवविविधता देशी झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. शोभेसाठी जंगले वाढविणे गरजेचे नाही; तर त्यांचा वापर जैवविविधता टिकविण्यासाठी झाला पाहिजे.

निसर्गप्रेमी : अमर मारुतीराव जत्राटे ( बालिंगे )