शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांना ‘केडीसीसी’चा दरवाजा बंद

By admin | Updated: January 20, 2015 00:52 IST

गैरव्यवहाराची चौकशी भोवणार : नावावर ठराव करण्यात अडचण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) माजी संचालकांना महाराष्ट्र सहकार कायदा कलम ‘८८’ अन्वये सुरू असलेली गैरव्यवहाराच्या चौकशीवरील कारवाई चांगलीच भोवणार असून, त्यांच्या नावावर कोणत्याही संस्थेचा ठराव करता येणार नाही. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होणार असल्याने त्यांना ही जबाबदारीची रक्कम भरूनच पात्र व्हावे लागणार आहे; पण या रकमेचा आकडा पाहिला तर सुमारे चार कोटी असल्याने बहुतांश माजी संचालकांना बॅँकेचे दरवाजे बंद होण्याची चिन्हे आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने विनातारण कर्जवाटप, अपुऱ्या तारणांसह सदोष कर्जवाटप केल्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २००९ ला बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक धनंजय डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक मंडळाने बॅँकेच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या ४५ आजी-माजी संचालकांसह चार अधिकाऱ्यांना दोषी धरत त्यांच्यावर तब्बल ११७ कोटी ६८ लाख २५ हजार ४५० रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. या जबाबदारी संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी संचालकांना मुभा दिली. डोईफोडे यांनी संचालकांवरील ७२ (१), (२) व (३) ची कारवाई पूर्ण केली. त्यानंतर पुढील कारवाई सचिन रावल यांनी पूर्ण केली आहे. रावल पुढील आठवड्यात विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांच्याकडे अहवाल सादर करणार आहेत. केंद्र शासनाच्या ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे संस्थाचालकांवर कमालीचे निर्बंध आले आहेत. संस्था विश्वस्तांच्या कारनाम्यामुळेच चांगल्या संस्था अडचणीत आल्याने पोटनियम दुरुस्तीमध्ये संचालकांवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. ‘केडीसीसी’ बॅँकेच्या संचालकांवर कलम ‘८८’ अन्वये कारवाई सुरू आहे. चौकशी मध्ये ११७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार स्पष्ट होत आहे. यातील काही रक्कम बॅँकेने वसूल केली आहे; पण उर्वरित रक्कम व्याजासह १४० कोटींपर्यंत जाणार आहे. संचालकांची संख्या व वसूलपात्र रक्कम पाहता प्रत्येकाच्या अंगावर सुमारे साडेचार कोटी रुपये बसणार आहेत. यामुळे सहकार नियमानुसार हे माजी संचालक निवडणूक लढविण्यास अपात्र ठरत आहेत. त्यांच्या नावावर ठराव झाला तरीही अंतिम मतदार यादी तयार करताना ते अवैध ठरण्याची शक्यता आहे. अंतिम मतदार यादी तयार करण्यापूर्वी संबंधितांना ही रक्कम भरावी लागणार आहे. (प्रतिनिधी)पोटनियम दुरुस्तीनुसार कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार मतदार असणार नाही. त्यामुळे ज्या संस्थेच्या संचालकावर ‘८८’अन्वये कारवाई सुरू आहे, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केल्यानंतर तेही कायद्यानेच अपात्र ठरतात. - राजेंद्र दराडे (विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर) दाद मागावी लागणारजबाबदारी निश्चितीवर संचालक न्यायालयात दाद मागू शकतात; पण तत्पूर्वी त्यांना राज्य शासनाकडे दाद मागावी लागणार आहे. शासनाचे म्हणणे घेतल्यानंतर न्यायालयापुढे आपली बाजू मांडू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.