शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तूरला सतेज कृषी औजार बँक स्थापन; आपटे फाउण्डेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तूर (ता. आजरा) येथे मुकुंदराव आपटे फाउण्डेशनतर्फे सतेज कृषी औजार बँक स्थापन केली ...

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तूर (ता. आजरा) येथे मुकुंदराव आपटे फाउण्डेशनतर्फे सतेज कृषी औजार बँक स्थापन केली आहे, अशी माहिती जि. प. सदस्य उमेश आपटे यांनी दिली.

आपटे म्हणाले, आपटे फाउण्डेशनतर्फे यापूर्वी वाढदिवसानिमित्त वह्या, कंपास, छत्र्या, सॅक, टिफिन बॉक्स व शालोपयोगी साहित्य वाटप केले आहे.

गतवर्षी कोरोनामुळे उत्तूर जि. प. मतदारसंघातील नागरिकांना ७० हजार मास्कचे वाटप केले आहे. कोरोनामध्ये अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले. मात्र, शेतीने नागरिकांना मोठी साथ दिली. या काळात शेतीची चांगली देखभाल झाल्याने पीक उत्पादन चांगले मिळाले.

शेती करताना आलेल्या अडचणींची माहिती घेतली. उत्तूरमध्ये १० ते २० गुंठे क्षेत्र असलेले २१२ शेतकरी आहेत. २० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी शेती औजारे विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी माफक दरात औजारे वापरासाठी देण्यात येणार आहे.

या सामान्य शेतकऱ्यांसाठी सतेज कृषी औजारे बँक स्थापन करण्याचा निर्णय झाला. यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली (१), पलटी (१), बांडगे (१), रोटर (१), डिझेल इंजिन (१), खोरे, टिकाव, बुट्टी, पार (प्रत्येकी ५० संच), औषध पंप (१०), भात कापणी खुरपी (१०००), भात वारे पंखे याशिवाय जाड दोरखंड हे साहित्य खरेदी करण्यात आले आहे.

बैठकीस सरपंच वैशाली आपटे, उपसरपंच सचिन उत्तूरकर, सुधीर जाधव, संजय उत्तूरकर, सचिन परीट, ज्योतिबा पोवार, संभाजी कुराडे, बाजीराव कुंभार, दत्ता चव्हाण, किरण आमणगी, राजू खोराटे, सतीश खरंदाळे, अशोक पाटील, सचिन परीट, झुलपेवाडीचे सरपंच नामदेव जाधव, आर्दाळचे सरपंच विद्याधर गुरव, उपसरपंच अमोल बांबरे, नारायण देसाई, विजय गुरव, सुनील सावंत, अनिल जांभळे, सागर सरोळकर, राजू पाटील, बाबासाहेब पाटील, ज्ञानदेव परीट, शिवाजी पाटील, चंद्रकांत पाटील, मारुती हरेकर, दिग्विजय पाटील, चंद्रकांत खोत, महेश करंबळी आदी उपस्थित होते.