शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विशाळगडावरील अतिक्रमण, वाघनख्याबाबत खासदार शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

By भारत चव्हाण | Updated: July 9, 2024 18:59 IST

तिसऱ्या आघाडीचा उद्देश काय? 

कोल्हापूर : एखाद्या प्रश्नातून काही गडबड होऊ नये, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाने विशाळगडप्रश्नी दोन्ही घटकांशी संवादातून, चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. विषय जास्त ताणला जाईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये, असेही ते म्हणाले.विशाळगडावरील अतिक्रमण आणि पशुहत्या याबाबत माजी खासदार संभाजीराजे दि. १३ जुलै रोजी विशाळगडावर जाऊन शिवभक्तांच्या उपस्थितीत आंदोलन करणार आहेत, तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार शाहू छत्रपती यांना त्यांची भूमिका विचारली.त्यावेळी त्यांनी सांगितले की, विशाळगड येथे स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न आहे. अतिक्रमण हा प्रश्न केवळ एका घटकाला लागू नाही सर्वांना लागू आहे. अतिक्रमण असेल तर त्यावर प्रशासन योग्य कारवाई करेल. सर्वांनी एकत्र बसून हा विषय मिटविण्याची गोष्ट आहे. न्याय प्रविष्ट बाब असली तरी सर्वांनी एकत्र येत हा विषय मिटू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पुढाकार घेऊन दोन्ही बाजूशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला पाहिजे.तिसऱ्या आघाडीचा उद्देश काय? संभाजीराजे आणि आमदार बचू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीबाबत छेडले असता शाहू छत्रपती म्हणाले की, ते दोघे एकत्र येण्याचा विचार करत आहेत, असे तुमच्याकडून समजले; पण त्यांचा उद्देश काय आहे हे कळाल्याशिवाय त्यावर बोलणे उचित नाही; पण ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तेव्हाचा विषय तेव्हा हाताळू.छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं कोणते हे सांगणे कठीणलंडनहून आणल्या जाणार असलेल्या वाघनख्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काही पुराव्यानिशी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा केला आहे. ते बरोबर आहे की नाही हे शोधले पाहिजे. त्यावर संशोधन व्हायला पाहिजे. वाघनखं दुर्मीळ आहेत, असे नाही; परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं कोणते हे सांगणे कठीण आहे.जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाखासदार शाहू छत्रपती यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विशाळगडचा प्रश्न व्यवस्थित हाताळण्याच्या, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. सर्व संबंधितांची बैठक घेऊन यातून मार्ग काढा, माझी आवश्यकता असेल तर मलाही बोलवा, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती