कदम खण परिसरात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST2021-02-21T04:45:33+5:302021-02-21T04:45:33+5:30

कोल्हापूर : कदम खण, जुना वाशी नाका परिसरात घाणीच्या साम्राज्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी ...

Empire of dirt in the Kadam mine area | कदम खण परिसरात घाणीचे साम्राज्य

कदम खण परिसरात घाणीचे साम्राज्य

कोल्हापूर : कदम खण, जुना वाशी नाका परिसरात घाणीच्या साम्राज्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्याची दखल प्रशासन घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

कदम खणीत मुरूम, मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे खणीत जाणाऱ्या सांडपाण्याला अडथळा येत असल्याने ते तुंबून राहत आहे. या परिसरात राहणाऱ्या घरांजवळच पाणी तुंबून राहत असल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डास, आळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, सांंडपाण्याचा निचरा करावा, यासाठी महापालिकेकडे अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

फोटो- कदम खणीत मुरूम, मातीचा भराव टाकल्याने सांडपाणी तुंबून राहत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (फोटो-२००२२०२१-कोल-कदम खण)

Web Title: Empire of dirt in the Kadam mine area