शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची तयारी पूर्ण

By admin | Updated: October 20, 2015 00:14 IST

जे. एन. सहारिया : संवेदनशील भागात जादा पोलीस; सदोष यादीला मतदारही जबाबदार

 कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी याकरिता कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शहराच्या संवेदनशील भागांत जादा पोलीस कुमक देण्यात येईल, त्यामुळे कोणी प्रलोभन आणि दबावाला बळी पडणार नाहीत, असे सहारिया म्हणाले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुख्य गृहसचिव के. पी. बक्षी सोमवारी कोल्हापुरात आले होते. या सर्वांनी शासकीय विश्रामगृहावर निवडणूक आढावा बैठक घेऊन माहिती करून घेतली. याप्रसंगी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी अमित सैनी, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीव वर्मा, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्यासह सातही क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मनपा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, मतदार आणि उमेदवारांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे तसेच कोणत्याही प्रलोभनाला, दबावाला बळी न पडता मतदारांनी मतदान करावे. यासाठी निवडणूकयंत्रणेतील कर्मचारी विश्वास देण्याचे काम करत आहेत. निवडणुकीच्या कामकाजाचे जे बारा टप्पे ठरविण्यात आले होते, त्यापैकी नऊ टप्प्यांचे काम पूर्ण झाले. आता मतदान आणि मतमोजणी ही दोन महत्त्वाची कामे राहिली आहेत, असे सहारिया म्हणाले. मनपासाठी ३७८ मतदार केंद्रांवर मतदान होणार असून, मतदानासाठी आवश्यक ते मनुष्यबळ, वाहने, मतदान यंत्रे आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. चांगल्या पद्धतीने निवडणूक पार पडेल, अशी तयारी झाली आहे. आता पुढच्या काळात आमचे सर्व लक्ष हे आचारसंहिता अंमलबजावणी करण्यावर असेल. जास्तीत जास्त नियंत्रण ठेवले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रारूप तसेच अंतिम मतदार यादी चुकांबाबत सहारिया यांना विचारले असता मतदारयादीतील चुकांना आयोगाचे अधिकारी जसे काही प्रमाणात जबाबदार आहेत तसे मतदारसुद्धा जबाबदार असल्याचे ते म्हणाले. १ आॅगस्ट २०१५ ची यादी आपण निवडणुकीसाठी ग्राह्य धरली आहे. ही यादी भारत निवडणूक आयोगाने तयार केली आहे. यादी बिनचूक व्हावी म्हणून त्यात सुधारणा करण्यात आल्या तरीही काही चुका राहू शकतात. मतदारयादीतील चुकांना मतदारही जबाबदार असतात, कारण तीस टक्के लोक याद्यांकडे लक्षच देत नाहीत, असा दावा त्यांनी केला. खुलासा आल्यावर मुश्रीफांवर कारवाई माजी मंत्री हसन मुश्रीफ व आपले फोनवर बोलणे झाले त्यावेळी आपण ‘कलेक्टर पागल हैं क्या?’ असे शब्द वापरले होते का, असे विचारता, आपण तसे म्हणालो नव्हतो. चुकीचे वाक्य माझ्या तोंडी घालून मुश्रीफ यांनी दिशाभूल केली असल्याने त्यांना नोटीस लागू केली असून, त्यांचा खुलासा येऊ दे मग काय करायचे ते पाहू, असे सहारिया म्हणाले. अद्ययावत मतदार याद्यांचे काम सुरूराज्यात पुढील वर्षी ऐशी टक्के जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होत आहेत. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम ८ आॅक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मतदारांनी याबाबत दक्ष राहून आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून घ्यावी. कारण पुढील निवडणुकीसाठी याच याद्या वापरल्या जाणार आहेत, असे आवाहनही त्यांनी केले.