पेठवडगाव येथे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:13+5:302021-02-05T06:53:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथील वडगाव विद्यालयाच्या नजीक राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन ...

Elderly couple commits suicide at Pethwadgaon | पेठवडगाव येथे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

पेठवडगाव येथे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : येथील वडगाव विद्यालयाच्या नजीक राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली. ही घटना गुरुवारी (दि.२८ ) सकाळी ७च्या सुमारास उघडकीस आली. शिवाजी ज्ञानू ठोंबरे (वय ८५), मुक्ताबाई शिवाजी ठोंबरे (वय 80) असे या दाम्पत्याची नावे आहे. याबाबत फिर्याद महेश संजय ठोंबरे यांनी पोलिसांत दिली आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी ठोंबरे हे जुन्या काळातील भाजीपाला व्यापारी होते. हे दाम्पत्य एकत्रित भाजीपाला व्यवसाय करत. आठ दिवसांपूर्वी शिवाजी ठोंबरे हे बाथरूममध्ये पडल्याने त्यांचा पायाला पॅक्चर झाले होते. त्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती. आजपर्यंत स्वावलंबी जीवन जगणाऱ्या हा दाम्पत्याला याचा मानसिक धक्का बसला होता. यामुळे दोघांना ही नैराश्य आले होते.

नेहमीप्रमाणेच बुधवारी दोघांनी मुलगा संजय यांच्याकडे जेवण करून रात्री झोपी गेले होते. दरम्यान, आज सकाळी त्यांना सून सावित्री या दोघांना उठविण्यास आल्या. त्यावेळी खोलीत त्यांना सासूबाई मुक्ताबाई यांनी धोतर व साडीचा गळफास तयार करून खिडकीस, तर सासरे शिवाजी यांनी दोन खिडकींना धोतर व साडी याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नातू महेश यांनी पोलिसांत धाव घेतली. मृतदेहांची वैद्यकीय तपासणी नवे पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. यामध्ये आत्महत्या केल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस व विविध टीमनी भेटी दिली. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक नासीर खान करीत होते.

या दाम्पत्याला तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. रक्षाविसर्जन शनिवारी आहे.

२८ शिवाजी ठोंबरे

२८ मुक्ताबाई ठोंबरे

Web Title: Elderly couple commits suicide at Pethwadgaon