शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीसाठी आठ हजार उमेदवार

By admin | Updated: September 1, 2015 23:56 IST

२७ जागा : शनिवारपर्यंत प्रक्रिया

कोल्हापूर : कृषी महाविद्यालय येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रादेशिक सेना भरतीतील २७ जागांसाठी पहिल्याच दिवशी सुमारे आठ हजार उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. आज, बुधवारीही भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. शनिवार (दि. ५) पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री यांच्या वतीने बटालियन परिसर व कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर शिपाई (जनरल ड्यूटी), लिपिक, आदी २७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. सकाळी सहा वाजलेपासून मैदानावर एकच गर्दी झाली. सकाळी सातनंतर १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाईफ इन्फंट्रीचे कर्नल अ‍ॅलेक्स मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रथम उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना एकत्र बसविले. यावेळी ५० जणांचा एक गट करून त्यांची कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर धावण्याची चाचणी घेण्यात आली. आज, बुधवारपर्यंत धावण्याची चाचणी होणार आहे. त्यानंतर शनिवारपर्यंत उंची, वजन, कागदपत्रे तपासणी, आदी प्रक्रिया झाल्यानंतर निवड केली जाणार आहे. कॅमेऱ्यांची नजर भरतीची प्रक्रिया सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात नोंद करण्यात येत आहे. कृषी महाविद्यालय मैदानाभोवतीही कॅमेरे लावले आहेत. सेनेत पैसे देऊन भरती होता येत नाही. जर कोणी भरतीसाठी पैशांची मागणी केली, तर संबंधित उमेदवारांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील जवान प्रत्येकाला करीत होते. अशी आहेत पदे जनरल ड्यूटीसाठी एकूण जागा २५ असून यासाठी किमान दहावी पास (४५ टक्के गुण आवश्यक), टेक्निकल एज्युकेशन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. लिपिक पदासाठी २ जागा असून किमान बारावी पास, दोन्ही जांगासाठी राज्य व जिल्हा पातळीवरील खेळाडंूना प्राधान्य. टंकलेखन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. ‘व्हाईट आर्मी’ची मदतकोल्हापुरात सुरू असलेल्या सैन्यभरतीसाठी आलेल्या एक हजार उमेदवारांना व्हाईट आर्मीतर्फे मोफत जेवण देण्यात आले. सामाजिक बांधीलकी जपत व्हाईट आर्मीतर्फे पुढाकार घेण्यात येत आहे.