शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक वादातून नागावच्या सरपंचासह आठजणांना मारहाण, कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:56 IST

दरम्यान एका हॉटेलमध्ये सतपाल मगदूम व नरके गटाचे काही तरुण यांच्यात बाचाबाची झाली होती. काहींनी मध्यस्थी करून वाद थांबविला होता

दिंडनेर्ली : पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास सहकार्य केले नसल्याच्या रागातून (नागाव, ता. करवीर)चे सरपंच सतपाल मगदूम यांच्यासह इतर आठ जणांना दगड, काठीच्या साह्याने मारहाण केली आहे. यामध्ये कृष्णात महादेव शिंदे, अवधूत श्रीपती शिंदे (नागाव ता. करवीर) हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी नंदगाव येथील कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सनी नरके यांच्यासह ११ जणांवर इस्पूर्ली पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडनेर्ली पं.स. गणात काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदगाव येथील सुजाता सनी ऊर्फ मनीष नरके या तर भाजपच्या वतीने दिंडनेर्ली येथील राजश्री सुरेश पाटील यांच्यात लढत झाली होती. यामध्ये राजश्री पाटील यांनी विजय मिळवला. निवडणुकीतील पराभव नरके गटाच्या जिव्हारी लागला होता. निकाल लागल्यापासून नागावचे सरपंच सतपाल मगदूम यांनी आपल्याला मदत केली नसल्याचा राग नरके गटात धुमसत होता. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये सतपाल मगदूम व नरके गटाचे काही तरुण यांच्यात बाचाबाची झाली होती. काहींनी मध्यस्थी करून वाद थांबविला होता. 

पण, गावी आल्यानंतर नरके गटाचे पंधरा ते वीस जण नागावमधील बिरदेव मंदिरासमोरील चौकात गेले. सरपंच सतपाल मगदूम, कृष्णात शिंदे, अवधूत शिंदे, संभाजी मगदूम, मोहन मगदूम, कृष्णात खामकर, निवास कराडे, मारुती कांबळे, अनिल तेली (सर्व रा. नागाव) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये कृष्णात शिंदे व अवधूत शिंदे जखमी झाले. घटनास्थळी दगडांचा खच पडला होता. दगडफेकीत दुचाकी व चारचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

सतपाल मगदूम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनिष ऊर्फ सनी पांडुरंग नरके, संग्राम नरके, पांडुरंग नरके, विजय गायकवाड, जयवंत नरके, ऋषी झांबरे, राहुल नरके, राकेश नरके, प्रमोद नरके, सचिन टिके, विठ्ठल चौगुले (सर्व रा. नंदगाव) यांच्यासह अन्य ५ ते ६ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. करवीरचे पोलिस अधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन कारवाईच्या सूचना दिल्या. अधिक तपास साहाय्यक फौजदार किरण माने करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Post-election violence: Village head, eight others assaulted; 11 booked.

Web Summary : Following Panchayat Samiti election disputes, a village head and eight others were attacked. Police booked 11 individuals, including a Youth Congress leader, for assault and property damage in Nagao.