जिल्ह्यात आठ महिन्यांत ८४ महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:16+5:302021-09-23T04:27:16+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ८४ महिला विकृत वासनेच्या शिकार झाल्या आहेत. या कालावधीत बलात्काराच्या ८४, तर विनयभंगाचे ...

In eight months, 84 women fell prey to perverted lust in the district | जिल्ह्यात आठ महिन्यांत ८४ महिला विकृत वासनेच्या शिकार

जिल्ह्यात आठ महिन्यांत ८४ महिला विकृत वासनेच्या शिकार

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ८४ महिला विकृत वासनेच्या शिकार झाल्या आहेत. या कालावधीत बलात्काराच्या ८४, तर विनयभंगाचे २१४ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय गतवर्षीच्या तुलनेत महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी लॉकडाऊन असल्याने महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. पण आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. त्यामध्ये विवाहितेचा छळ, हुंड्यासाठी छळ, बलात्कार, विनयभंग, खून, खुनाचा प्रयत्न अशा विविध प्रकारचे गुन्हे महिलांच्या बाबतीत घडले आहेत. यात अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. काहीवेळा महिलांना पळवून नेऊन तर काही वेळा लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले जातात.

-----------

महिना : गुन्ह्याचा प्रकार विवाहितेचा छळ : विनयभंग : बलात्कार : हत्या

जानेवारी : १५ : २५ : ९ : २

फेब्रुवारी : २६ : १५ : ९ : २

मार्च : ३० : ४० : १४ : २

एप्रिल : २७ : ३४ : १० : ३

मे : १५ : २५ : ८ : १

जून : २१ : २७ : ११ : ०

जुलै : १७ : १८ : १७ : १

ऑगस्ट : २३ : ३० : ६ : २ , आत्महत्येस प्रवृत्त करणे : ३ , हुंडाबळी : २

----

अल्पवयीनवरील अत्याचाराचे १७९ गुन्हे

अत्याचारात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाणही गंभीर आहे. गेल्या आठ महिन्यांत पोस्कोचे ३७, विनयभंगाचे ३७, फूस लावून पळवून नेल्याचे ९८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात अनैसर्गिक बलात्काराचीदेखील एक तक्रार आहे. बालविवाहाच्या दोन घटना समोर आल्या आहेत.

----------

गतवर्षीच्या तुलनेत वाढ

गेल्यावर्षी बलात्काराच्या ११५ गुन्ह्यांची नोंद झाली होती यंदा त्यात वाढ होऊन २१४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विनयभंगाच्या तक्रारीत मात्र घट झाली आहे. गेल्यावर्षी विनयभंगाच्या ३१८ तक्रारी आल्या होत्या. यंदा ८४ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

---

Web Title: In eight months, 84 women fell prey to perverted lust in the district