कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:54+5:302021-04-13T04:22:54+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंध उपाययोजना तातडीने राबवून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबधिताना ...

Effective measures should be taken to prevent corona | कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात

कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंध उपाययोजना तातडीने राबवून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबधिताना द्यावेत, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.

या ई मेलमध्ये गतवर्षी सीपीआरला शंभरहून अधिक व्हेंटीलेटर देण्यात आले होते. त्यातील ४० व्हेंटीलेटर नादुरुस्त असल्याने उपचारावर मर्यादा येत आहेत. तरी त्यांची दुरुस्ती केली जावी. कोल्हापूर जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करून द्यावेत. रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत कमी करण्यात यावी, हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावे, त्याचा काळाबाजार होऊ नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अतिगंभीर सर्व कोविड रुग्णांवर एकाच छताखाली प्रभावी उपचार होण्याकरिता प्रशासनाने एक हजार बेड्सचे सुसज्ज व अद्यावत जंबो कोव्हीड सेंटर निर्माण करणेबाबत जिल्हा प्रशासनास आराखडा व प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आपल्यामार्फत व्हाव्यात. जिल्ह्यातील खासगी रुग्णालये ताब्यात घ्याव्यात, या नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनांचा लाभ मिळावा. खासगी रुग्णालयांनी अतिगंभीर रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी रुग्णालयाला १०० हून अधिक व्हेंटिलेटर देण्यात आले होते. त्यातील सुमारे ४० हून अधिक व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याने उपचारावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे तत्काळ या व्हेंटिलेटरची दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यावेत. केंद्र शासनाने राज्य शासनास ११२१ व्हेंटीलेटर उपलब्ध करून दिले असून, पुणे विभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, तात्काळ आपल्या आखत्यारीत येत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यास यामधील अधिक व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करून द्यावेत, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

--

Web Title: Effective measures should be taken to prevent corona