शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Datta Jayanti 2025: ‘श्री गुरुदेव दत्त’ नामाने दुमदुमली नृसिंहवाडी, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:28 IST

Nrusinhawadi Datta Jayanti 2025 Celebration: सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ होणार

दुर्वा दळवीकोल्हापूर: आज, गुरुवारी सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा होत आहे. कोल्हापुरातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी श्री दत्त संप्रदायाची राजधानी म्हणून ओळखली जाते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा दुग्धशर्करा योग साधत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मध्यरात्रीपासूनच शिरोळ-कुरुंदवाड मार्गावरून हजारो भाविक ‘श्री गुरुदेव दत्त’ नामाचा जप करत नृसिंहवाडीत पायी चालत दाखल झाले. पहाटेपासून मंदिर परिसर दत्तमय नामाने दुमदुमून गेला आहे.दत्तजयंती निमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी नृसिंहवाडीत येतात. दर्शनासाठी  येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनाने नियोजन केले आहे. मंदिर परिसर, कृष्णा-पंचगंगा संगम घाट आणि गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिरात गेल्या आठवड्याभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, षोडशोपचार पूजा,पंचामृत अभिषेक, महापूजा यांसारखे धार्मिक विधी संपन्न झाले असून दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा व महाप्रसाद, दुपारी तीन वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसूक्तांचे पठण होईल. दुपारी चारनंतर नारायणस्वामी महाराजांच्या मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात येईल. सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ होणार आहे. त्यानंतर पारंपरिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा वाटण्यात येणार आहे. नऊनंतर धूप, दीप आरती व पालखी सोहळा झाल्यानंतर रात्री शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर विनोद पुजारी यांच्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची  सजावट करण्यात आली आहे. राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक ठेवून बंदोबस्त तैनात केला आहे. दत्त जयंती निमित्त नृसिंहवाडी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेल्याचे पहायला मिळत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Narasimha Wadi Echoes with 'Shri Gurudev Datta' on Datta Jayanti.

Web Summary : Narasimha Wadi, a Datta pilgrimage site, celebrated Datta Jayanti with devotion. Thousands flocked, chanting 'Shri Gurudev Datta'. Religious rituals were performed, and security was heightened to manage the large crowds from various states.
टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीkolhapurकोल्हापूरDatta Mandirदत्त मंदिरshree datta guruदत्तगुरु