शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’च्या विक्रीत ‘थिटे पेपर्स’चा खोडा

By admin | Updated: August 23, 2015 17:53 IST

नव्याने पेच : ‘शिवशक्ती’, ‘तासगांवकर शुगर्स’च्या निविदा दाखल

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी शनिवारी ‘शिवशक्ती शुगर्स’, ‘अथणी व तासगांवकर शुगर्स’, मुंबई यांनी निविदा दाखल केल्या. या निविदा सोमवारी (दि. २४) उघडल्या जाणार आहेत, पण उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेविरोधात थिटे पेपर्स सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे ‘दौलत’च्या विक्रीत ‘थिटे’चा खोडा पडण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या थकीत ६२ कोटी कर्जापोटी ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने बॅँकेने कारखाना विक्रीस काढला आहे. जिल्हा बॅँकेने कारखान्यांची २२० कोटी राखीव किंमत सांगितली आहे. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर खासदार प्रभाकर कोरे यांच्या ‘शिवशक्ती’ शुगर्स, तासगांवकर शुगर्स व आमदार संजय पाटील यांनी निविदा फॉर्म घेतले होते पण त्यापैकी शनिवारी अखेरच्या दिवशी ‘शिवशक्ती’ व तासगांवकर शुगर्स यांनी निविदा दाखल केल्या. या निविदा सोमवारी उघडण्यात येणार आहेत. दरम्यान, ‘दौलत’चा ताबा जिल्हा बॅँकेचा की थिटे पेपर्स, प्रा. लि. नाशिक हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला होता. २५ मार्च २०१५ ला उच्च न्यायालयाने थिटे पेपर्सची याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात थिटे पेपर्स सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. ही याचिका सर्वाेच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून ‘दौलत’ कारखान्याची विक्रीबाबत जिल्हा बँकेने सुरू केलेली प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे थिटे पेपर्सने नोटिसीद्वारे म्हटले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विक्रीची प्रक्रिया सुरू करणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर साखर कारखाना तातडीने सुरू करण्यात येईल शिवाय या कारखान्याबाबतचे अपील प्रलंबित असताना हा कारखाना कोणी चालवावा, त्या संबंधित काही अधिकार घेतल्यास ते अधिकार हे पूर्णपणे बेकायदेशीर व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे असेल. त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा थिटे पेपर्स प्रा. लि. कंपनीने जिल्हा बॅँकेला दिला आहे. त्यामुळे ‘दौलत’ विक्रीसमोर नव्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) ि थटेंचा बोलविता धनी कोण? थिटे पेपर्स ही नाशिकची कंपनी, ‘कर्नाटकच्या सीमेवर असलेला ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर घेतला कसा व केव्हा? याविषयी सुरुवातीपासूनच चंदगड तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यात गेले चार वर्षांत कारखाना सुरू व्हावा म्हणून कोणीच प्रयत्न केले नाहीत, पण सुरुवातीला भाडेतत्त्वावर देण्यास आणि आता विक्रीस विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे थिटेंचा बोलविता धनी कोण? याविषयी सध्या बॅँकेच्या वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे.