शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत ऊसतोडणीमुळे चाऱ्याचा प्रश्न निकाली

By admin | Updated: November 21, 2015 00:14 IST

कारखान गट आॅफिसवर गर्दी : ऊस लवकर जाणयासाठी प्रयत्न, रस्ते ऊस वाहतुकीच्या वाहनांनी गजबजले

संजय पाटील -- सरूड --सध्या ग्रामीण भागामध्ये गेल्या १५ दिवसांपासून ऊस तोडणी सुरळीत चालू असल्यामुळे जनावरांना लागणाऱ्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न उसाच्या वाड्याच्या माध्यमातून सुटला आहे. ऊस उत्पादनात घट होत असली तरी शेतकरी वर्गाचे लक्ष चालू वर्षी उसाला किती ‘एफआरपी’ जाहीर होते व आपला ऊस कारखान्यास कसा लवकर घालवून अन्य पीक कसे घेता येईल, याकडे लागले असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध शेतकरी संघटना व शासन कारखानदार यांच्यात ऊसदरावरून आंदोलने होत होती. त्याकाळी आधी आंदोलन व त्यानंतरच कारखाने चालू असे चित्र बनले होते. त्याचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होत होता. शासन व कारखानदार यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ऊस दर जाहीर होण्यास विलंब लागत होता. आंदोलन तीव्र झाली की मात्र शासन जागे होत होते व विविध शेतकरी संघटना जो म्हणेल तो दर मान्य करून कारखाने दीड महिना उशिरा चालू होत होते. परंतु, निव्वळ मोलमजुरी तसेच ऊस तोडणीवर उदरनिर्वाह करणारे सर्वसामान्य लोक, तसेच शेतकरी वर्ग यांच्यावरती विपरीत परिणाम होत होता. कारखाने चालू नसल्यामुळे लोकांच्या हाताला काम नव्हते. त्याचा परिणाम गावागावांतील विविध व्यापारी वर्गावर होत होता. परंतु, चालू वर्षी मात्र गेल्या अनेक वर्षापेक्षा चित्र वेगळे दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कारखाने विना आंदोलन करता चालू झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सध्या शांततेच्या मार्गाने यावरती तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत या संघटनेने शासन, कारखानदार यांच्याकडून गतवर्षी गेलेल्या उसाचे बिल ‘एफआरपी’प्रमाणे देऊन चालू गळीत हंगामासाठी शासन, कारखानदार किती ‘एफआरपी’ जाहीर करणार? अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. जर शासन अपेक्षित दर जाहीर करणार नसेल तर अपेक्षित दर मिळविण्यासाठी योग्य मार्गाने पावले उचलली जातील, असा इशाराही या निमित्ताने ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. चालू वर्षी पावसाचे घटलेले प्रमाण लक्षात घेता ऊस उताऱ्यावर देखील कमालीचा परिणाम झाला आहे. त्यातच वाढती महागाई, आर्थिक टंचाई यासारख्या समस्या जनतेसमोर आवासून उभ्या आहेत. ग्रामीण पट्ट्यात मात्र चालू वर्षी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र, ऊसतोडी चालू झाल्यामुळे उसाचे वाडे विकून का होईना घरसंसार चालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.एकूणच चालू वर्षी ऊसतोडी व कारखाने लवकर चालू झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. ग्रामीण भागात मोलमजुरी करणारी काही कुटुंबे आहेत, त्यांच्यातही चैतन्याचे वातावरण आहे. परंतु, शेतकरी वर्गाचे लक्ष चालू वर्षाच्या ‘एफआरपी’कडे लागले असल्याचे चित्र दिसत आहे.