शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

प्रताप चव्हाणांमुळेच जिल्हा बॅँक सक्षम

By admin | Updated: June 20, 2017 01:14 IST

हसन मुश्रीफ : नाबार्ड तपासणीनंतर अनुकंपा, रोजंदारी मागण्यांबाबत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा बॅँकेचे कर्मचारी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण यांच्या दरम्यान काही मतभेद आहेत. आगामी काळात संघटना प्रतिनिधी व चव्हाण यांची बैठक घेऊन एकमेकांच्या मनातील क्लिमिष काढले जाईल. पण, जिल्हा बॅँकेला अडचणीतून बाहेर काढण्यात प्रताप चव्हाण यांचे योगदान मोठे असून, ते कोणीही नाकारू शकत नाही, अशा शब्दांत बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी निर्वाळा दिला. अनुकंपाची भरती व रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाबार्ड तपासणीनंतर निश्चित मार्गी लावला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तीन-चार बैठका झाल्या. यामध्ये बॅँकेची वस्तुस्थिती सांगितली. तरीही मोर्चा काढल्याने आपण व्यथित झालो. रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार २ टक्केपेक्षा कमी व्यवस्थापन खर्च ठेवणे व मार्च २०१७ अखेर ९ टक्के सीआरएआर राखणे बंधनकारक होते. अधिकारी व संचालकांच्या सहकार्याने ७४ कोटी संचित तोटा कमी होऊन बॅँक नफ्यात आली. नाबार्डची तपासणी जुलै-आॅगस्टमध्ये आहे, बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या ताळेबंदावर नाबार्डने शिक्कामोर्तब केला. अनुकंपा व रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल. प्रताप चव्हाण यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी कर्मचाऱ्यांची असली तरी मोर्चा काढून एखाद्याला बदनाम करणे योग्य नाही. यामुळे बॅँकेचे मोठे नुकसान झाले असून, येथून पुढे असा प्रकार टाळला पाहिजे, यासाठी संघटना व चव्हाण यांना सोबत घेऊन एकमेकांच्या मनातील क्लिमिष काढले जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. त्यांना राज्य बॅँकेतून हाकललेले नाही, अशा प्रकारची बदनामी करणे, योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.संचालक मंडळ मॉरिशस दौऱ्यावरजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक संचित तोट्यातून बाहेर येऊन नफ्यात आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ संचालक मंडळ परदेश दौऱ्यावर निघाले आहे. ४ जुलैला मॉरिशस व दुबईसाठी रवाना होणार आहे. अपुरे तारण व चुकीच्या कर्जवाटपामुळे बँकेवर १३ नोव्हेंबर २००९ ला प्रशासकीय मंडळ आले. सहा वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर मे २०१५ मध्ये संचालक मंडळाच्या ताब्यात पुन्हा कारभार आला. संचालक मंडळ कार्यरत झाले तरी बॅँकेचा पावणेदोनशे कोटीचा संचित तोटा होता. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅँकेच्या निर्देशानुसार मार्च २०१६ पर्यंत ७ टक्के, तर मार्च २०१७ पर्यंत ९ टक्के सीआरएआर राखणे बंधनकारक होते. संचालक मंडळाने मार्च २०१७ अखेर १०.५० टक्के सीआरएआर राखण्यात यश मिळाले. थकीत बड्या कर्जदारांच्या दारात जाऊन ढोल-ताशांच्या गजरात वसुली मोहीम राबविली. त्यामुळेच बॅँकेला १२ कोटींचा निव्वळ नफा होऊ शकला. यासाठी संचालक मंडळ परदेश सहलीवर जात आहेत. सहलीवर प्रतापसिंह चव्हाण जाणार नसल्याचे समजते. व्यवस्थापक ठरविण्याचा अधिकार संचालकांचाबॅँकेचा व्यवस्थापक कोण असावा, हे ठरविण्याचा अधिकार संचालकांचा आहे. युनियन हे ठरवू शकत नाही. बॅँकेचे हित सर्वांपेक्षा मोठे असते, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी युनियनच्या ‘चव्हाण हटाव’ मागणीला उत्तर दिले. बहुतांशी कारखान्यांना कर्जपुरवठादोन साखर कारखाने वगळता जिल्ह्यातील इतर कारखान्यांना जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे युनियनने केलेला आरोप चुकीचा असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.