शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप प्रादेशिक आराखडा २१ सप्टेंबरला :

By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST

चोक्कलिंगम --हा आराखडा अंतिम होणार आहे,

कोल्हापूर : जिल्ह्याचा प्रारूप प्रादेशिक आराखडा २१ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर हरकती व सूचना घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, यानंतर हा आराखडा अंतिम होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक आराखड्यासह विविध बैठका झाल्या. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.विभागीय आयुक्त चोक्कलिंगम म्हणाले, प्रादेशिक आराखड्यासंदर्भात नियुक्त मंडळाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. तत्पूर्वी आराखड्याशी संबंधित पर्यावरण, पुरातत्त्व, दळणवळण, औद्योगिक समित्यांकडून आढावा घ्यायचा होता. त्यानुसार या ठिकाणी या समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचना घेण्यात आल्या आहेत. या सूचनांवर मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन २१ सप्टेंबरला प्रारूप प्रादेशिक आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. या काळात सूचना व हरकती प्राप्त झाल्यावर त्यावर निर्णय घेऊन तो अंतिम केला जाईल.हद्दवाढीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या गावांसाठी राज्य शासनाने प्राधिकरणचा प्रस्ताव दिला आहे. याचा परिणाम प्रादेशिक आराखड्यावर होईल का? अशी विचारणा चोक्कलिंगम यांना केली असता ते म्हणाले, या ठिकाणी प्राधिकरण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. याच्या नियोजनासाठी पुढील किमान तीन वर्षांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रादेशिक आराखड्यासाठी करण्यात येणारे नियोजन थांबवून चालणार नाही. तसेच या प्राधिकरणसाठी प्रादेशिक आराखड्याचा कोणताही अडथळा येणार नाही. प्राधिकरणाच्या प्रक्रियेबरोबरच आराखड्यानुसार विकासाचे कामही सुरू राहील.ते म्हणाले, स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, यासाठी जिल्हा परिषदेने चांगले काम केले आहे. कोल्हापूरसह सांगली व सातारा या तीन जिल्ह्णांसाठी असणारे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र हे सांगलीला हलविण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु ते कोल्हापुरातच राहावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश येऊन या प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, नगररचना विभागाचे उपसंचालक मो. र. खान, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करागणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीचे प्रदूषण होऊ नये याची खबरदारी सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे. यासाठी गतवर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असून, यंदा शंभर टक्के प्रदुषणमुक्त गणेशोत्सव करण्याचा प्रयत्न करूया. गणेश विसर्जनासाठी जिल्हा परिषद व महापालिका यांनी योग्य नियोजन केले आहे, त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी नागरिकांसह गणेशोत्सव मंडळांना केले आहे.