शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप मतदार यादीतही घोळ

By admin | Updated: September 20, 2015 01:51 IST

महापालिका निवडणूक : प्रशासनाच्या कारभारावर इच्छुकांची नाराजी

कोल्हापूर : प्रभाग रचना करताना आणि आरक्षण टाकताना झालेल्या गंभीर स्वरूपाच्या चुकांमधून महानगरपालिका प्रशासनाने अद्याप शहाणपण शिकलेले दिसत नाही. शनिवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणार म्हणून जाहीर केले; परंतु शनिवारी दुपारपर्यंत या याद्या विभागीय कार्यालयाकडे पोहोचल्याच नाहीत. ज्या काही याद्या पोहोचल्या त्याची झेरॉक्स काढून देण्याच्या पद्धतीमुळे अत्यंत खराब मिळाल्या आहेत. महापालिकेच्या कारभारावर इच्छुक व त्यांच्या समर्थकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार शनिवारपासून शहरातील ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. याद्यांबाबत कमालीची उत्सुकता असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाकडे इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी चौकशी करायला सुरुवात केली. इच्छुक विभागीय कार्यालयात जाताच त्यांना निवडणूक विभागाकडून अद्याप याद्या उपलब्ध झालेल्या नाहीत. दुपारनंतर या, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे दुपारी चारनंतर पुन्हा चौकशी व्हायला लागली. त्यावेळी काही ठिकाणी झेरॉक्स काढायला पाहिजेत, असे सांगून सीएफसी सेंटरमध्ये पैसे भरून या, असे सांगण्यात येऊ लागले. काहींनी सीएफसी सेंटरमध्ये प्रत्येक पानाला दोन रुपये याप्रमाणे पैसे भरलेही, परंतु नंतर त्यांना झेरॉक्सही तुम्हीच काढून घ्या, असे सांगितले गेले. गांधी मैदान आणि शिवाजी मार्के ट विभागीय कार्यालयात तर सायंकाळी पाचनंतर याद्या मिळाल्या. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. सर्व प्रभागाच्या किमान १० प्रतीत प्रारूप मतदार याद्या उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना तसे घडले नाही. उलट उमेदवारांनाच झेरॉक्स मारून घ्या, असे सांगण्यात येत होते. प्रारूप याद्यांचा हा घोळ दिवसभर सुरू राहिला. त्यामुळे इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. प्रारूप मतदार याद्या या प्रत्येक पानांची झेराक्स काढून देण्यात येत आहेत. त्यामुळे मतदारांचे चेहरे ओळखत नाहीत. काही पानांची नावे पुसट आली आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. ज्यांना मतदार याद्या मिळाल्या त्यांनी याद्या फोडण्यात घोळ झाला असल्याचे सांगितले. पहिल्याच दिवशी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)