शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

रणजितसिंह डिसले यांना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:09 IST

Teacher Award Kolhpaur- ग्लोबल टिचर ॲवॉर्ड पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देरणजितसिंह डिसले यांना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून रविवारी वितरण : शुभांगी गावडे

कोल्हापूर : ग्लोबल टिचर ॲवॉर्ड पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापुरातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात रविवारी (दि.१७) सकाळी दहा वाजता शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविले. काही उपक्रमांचे संकल्प केले होते. त्यामध्ये या पुरस्काराचा समावेश होता. त्यानुसार बापूजींच्या नावाने पहिला पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिनी रविवारी प्रदान केला जाणार असल्याचे प्राचार्या गावडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात प्रा. अशोक पाटील, संजय सुतार, प्रदीप पाटील संपादित समर्पित गुरूदेव : प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. महेश शिंदे, शंकर शिंदे संपादित पुत्र अमृताचा व गंध चंदनाचा या ग्रंथांसह शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे दिनदर्शिका प्रकाशित केली जाणार असल्याचे सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी सांगितले. यावेळी सहसचिव डॉ. युवराज भोसले, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार उपस्थित होते.बापूजींच्या जन्मशताब्दीपासून विवेकानंद सप्ताहातील दि. १७ जानेवारी हा दिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचे प्राचार्या गावडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर