वारणा दूध संघाच्या अध्यक्षपदी डॉ. विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:30 IST2021-02-25T04:30:02+5:302021-02-25T04:30:02+5:30

वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (वारणानगर) यांची फेरनिवड, तर ...

Dr. as the President of the Warna Milk Association. Vinay Kore | वारणा दूध संघाच्या अध्यक्षपदी डॉ. विनय कोरे

वारणा दूध संघाच्या अध्यक्षपदी डॉ. विनय कोरे

वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (वारणानगर) यांची फेरनिवड, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक हिंदुराव रंगराव तथा एच. आर. जाधव (बहिरेवाडी) यांची बिनविरोध निवड झाली.

वारणा दूध संघाची सन २०२१ ते २०२६ या सालासाठीची संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही पंचवार्षिक निवडणूक आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली सातव्यांदा बिनविरोध झाली होती. बुधवारी दुपारी नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीत या निवडी केल्या.

यावेळी नवनिर्वाचित संचालक शिवाजीराव कापरे, अभिजित पाटील, ॲड. एन. आर. पाटील, शिवाजीराव जंगम, प्रदीप देशमुख, शिवाजीराव मोरे, राजवर्धन मोहिते, अरुण पाटील, दीपक पाटील, महेंद्र शिंदे, लालासाहेब पाटील, माधव गुळवणी, विजयकुमार पाटील, के. आर. पाटील, मयूर पाटील, डॉ. मिलिंद हिरवे, चंद्रशेखर बुवा, शोभा पाटील, शमशाद मुल्ला उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष डॉ. विनय कोरे, उपाध्यक्ष एच. आर .जाधव व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार वाशी शाखेचे व्यवस्थापक एस. एम. पाटील, वारणा दूध कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव व सर्व पदाधिकाऱ्यांनी केला.

.

फोटो-१ ) डॉ. विनय कोरे - अध्यक्ष

फोटो २ ) एच. आर. जाधव - उपाध्यक्ष

Web Title: Dr. as the President of the Warna Milk Association. Vinay Kore