डॉक्टर दाम्पत्याचा खून परिचिताकडूनच

By Admin | Updated: October 17, 2016 01:19 IST2016-10-17T01:19:12+5:302016-10-17T01:19:12+5:30

प्रदीप देशपांडे : छडा लावणारच

Doctor is a doctor's blood donor | डॉक्टर दाम्पत्याचा खून परिचिताकडूनच

डॉक्टर दाम्पत्याचा खून परिचिताकडूनच

कोल्हापूर : रुकडी (ता. हातकणंगले) येथील डॉ. प्रज्ञा व उद्धव कुलकर्णी या दाम्पत्याच्या खुनाचे गूढ अद्यापही कायम आहे. गेले दोन महिने पोलिस रात्रंदिवस कसून शोध घेत आहेत. मारेकरी हा डॉक्टर दाम्पत्याच्या परिचयाचा आहे. त्याने फक्त चोरीचा बहाणा केला आहे. खुनाचा मूळ उद्देश दुसराच आहे. अशा आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लवकरच लावू, असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रविवारी सांगितले.
रुकडी येथे डॉ. उद्धव दत्तात्रय कुलकर्णी व त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा या दाम्पत्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यांच्या रुग्णालयात परिचारिका किंवा कंपौंडर नाही. त्यांचे नातेवाईकही फारसे संपर्कात नसायचे. ज्या दिवशी खून झाला, त्या दिवशी रात्री आठ वाजता गावातील एक रुग्ण उपचार करून गेला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने पोलिसांची दमछाक होत आहे.
घराचा दरवाजा बंद असतो. ओळखीचा आवाज ऐकल्यानंतरच ते दरवाजा उघडत असत. त्यामुळे त्यांचा खून त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीने केल्याची शक्यता आहे. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा पुरावा नाही. कारागृहातून बाहेर पडलेल्या गुन्हेगारांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)


 

Web Title: Doctor is a doctor's blood donor