शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus- रुग्ण दाखल होताच आरटीपीसीआर करा, पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:13 IST

CoronaVirus Kolhapur : कोरोना लक्षणे असलेला रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांकडून जुजबी उपचार केले जातात, खासगी दवाखान्यात आठ दिवस ठेवून रुग्ण गंभीर झाला की त्याला सरकारी दवाखान्यात पाठवले जाते, असे न करता डॉक्टरांनी रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून मगच उपचार सुरू करावेत अन्यथा त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल, अशा सक्त सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देरुग्ण दाखल होताच आरटीपीसीआर करा, पालकमंत्र्यांचे आदेश खासगी डॉक्टरांना नोटीस काढणार

कोल्हापूर : कोरोना लक्षणे असलेला रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांकडून जुजबी उपचार केले जातात, खासगी दवाखान्यात आठ दिवस ठेवून रुग्ण गंभीर झाला की त्याला सरकारी दवाखान्यात पाठवले जाते, असे न करता डॉक्टरांनी रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून मगच उपचार सुरू करावेत अन्यथा त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल, अशा सक्त सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनेक रुग्ण जवळच्या जनरल प्रॅक्टिशनर्सकडून जुजबी उपचार करून घेतात. लक्षणे दिसत असली तरी डॉक्टर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करायला लावत नाहीत. नंतर आजार बळावला की रुग्ण सरकारी दवाखान्यात दाखल केला जातो.

तसे अनेक खासगी दवाखान्यांमध्ये आठ दिवस रुग्णांवर उपचार सुरू असतात, रुग्णाची स्थिती अतिगंभीर झाली की त्यांना सरकारी दवाखान्यात हलवले जाते यामुळे सरकारी रुग्णालयात मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे दाखल झाल्यानंतर शेवटच्या ७२, ४८ किंवा २४ तासांतील आहेत.

याचा अर्थ त्यांना योग्य पद्धतीने उपचार मिळाले नाहीत असाच होतो. त्यामुळे डॉक्टरांनी लक्षणे दिसताच रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या डेथ ऑडिटमध्ये संबंधित डॉक्टरने ही चाचणी केली नसल्याचे आढळून आल्यास त्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस पाठवली जाईल.तपासण्यांमुळे पॉझिटिव्ह रेट जास्तमंत्री पाटील म्हणाले, प्रशासनाने तपासण्या वाढवल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट जास्त दिसत आहे. तरीदेखील पूर्वीपेक्षा कमी होऊन २१ टक्क्यांवर आला आहे. तपासण्या वाढल्याने फायदाच होणार आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती रस्त्यावर फिरली की संसर्ग वाढेल, त्यापेक्षा तपासणीमुळे कोरोनाचे लवकर निदान होऊन तातडीने उपचार सुरू करता येईल. संसर्गदेखील कमी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर