शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त उसावर अवलंबून राहू नका

By admin | Updated: July 17, 2017 00:34 IST

फक्त उसावर अवलंबून राहू नका

लोकमत न्यूज नेटवर्कहलकर्णी : शेतकऱ्यांनी पिकविले तरच सर्वांना धान्य मिळते. पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचे नियोजन चुकणार आहे. केवळ उसावर अवलंबून राहू नका. कमी पाण्यात कमी दिवसांत येणारी पिके घ्या. समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्यांचा गौरव होतो, असे प्रतिपादन प. पू. श्री. गुरुसिद्धेश्वर स्वामीजी (कारीमठ हत्तरगी) यांनी केले. ते हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे हत्तरकी गटातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.वृक्षारोपण आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक व जि.प. सदस्य रेखाताई हत्तरकी यांचा सत्कार गुरुसिद्धेश्वर स्वामीजींच्याहस्ते झाला.गंगाधर व्हसकोटी व पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांचा सत्कार महाडिक यांच्याहस्ते झाला.महाडिक म्हणाल्या, कलेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उपजीविकेसाठी शिक्षण आवश्यक आहे; पण कला कसे जगायचे ते शिकविते. नेता सामान्य माणसापर्यंत पोहोचल्याशिवाय मोठा होत नाही. व्हसकोटी म्हणाले, मतदारसंघात अद्याप पेरण्या नाहीत. शासनाला पिकांची आणेवारी देताना या भागाचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्यास अधिकाऱ्यांना सांगावे, तसेच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. यावेळी संदीप व्हसकोटी, श्वेता हत्तरकी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी गोडसाखरचे संचालक सदानंद हत्तरकी, श्वेता हत्तरकी, जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक, जि.प. सदस्य रेखाताई हत्तरकी, वरदशंकर वरदापगोळ, पं. स. सदस्य इराप्पा हासुरे, पं.स. सदस्या रूपाली कांबळे, सरपंच सुमन भोसले, मदनभाई मेंदपाळा, तमान्ना पाटील, उदय देसाई, सातगोंडा जिनान्नावर, आनंद जाधव, बाबूराव पाटील, मलगोंडा पाटील यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. वरदशंकर वरदापगोळ यांनी स्वागत केले.