शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

ऊस बिलातून पाणीपट्टी कपात नको

By admin | Updated: December 14, 2015 00:06 IST

शेतकऱ्यांची मागणी : परवानगीशिवाय परस्पर वसुलीवर आक्षेप

सावरवाडी : सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या रकमेची वसुली केली जाते. मात्र, बऱ्याचवेळा या शेतकऱ्यांकडून जादा पाणीपट्टी वसूल केली जाते. या प्रकारामळे शेतकरीवर्गात नाराजी पसरली असून, शेतकऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीच्या रकमा कपात करू नयेत, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व सहकारी विकास सेवा संस्था शेतकऱ्यांच्या पीककर्ज व पाणीपट्टीच्या रकमांच्या वसुलीसाठी साखर कारखान्याकडे वसुली पत्रक पाठविले जाते. या वसुली पत्रकातून जादा रकमा कळवून त्यांच्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या जात नाहीत. जादा रकमा कळवून भ्रष्टाचार होऊ लागला आहे. संस्थेच्या सचिवांच्या गैरकारभाराबाबत ऊस उत्पादक शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून लेखी परवानगीशिवाय कोणत्याही सहकारी संस्थांच्या रकमेची कपात करू नये, अशा लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत. पाणीपट्टी व कर्ज प्रकरण वसुलीतून जादा रकमा उचलून एकप्रकाराचा घोटाळाच होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यासाठीच सहकारी साखर कारखान्यांनी ऊस बिलांची रक्कम थेट सहकारी संस्थांना कपात करू देऊ नये, याचा साखर कारखान्यांनी निर्णय घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलातून जादा रक्कम उचल करण्याचा प्रकार घडू लागल्याने सहकारी संस्थांच्या कारभाराची चौकशी करण्याची गरज आहे. संस्था सचिवांनी शेतकऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय ऊस बिलातून कोणतीच कापत करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू.’’ - नामदेव पाटील, भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य.