जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:00+5:302021-02-05T07:01:00+5:30

वारणानगर : कौशल्य विकास व रोजगार आधारित गरजू युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन ...

District Skill Development Employment, Entrepreneurship Guidance | जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन

वारणानगर : कौशल्य विकास व रोजगार आधारित गरजू युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयास सहायक आयुक्त संजय माळी यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा वारणा विभाग शिक्षण मंडळात प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर यांनी इयत्ता १० वीपासूनच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज असून वारणा त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

या कार्यक्रमास योगेश उंडाळे, प्रा. वैभव बुड्ढे, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर प्रा. नितीन कळंत्रे, प्रा. एन.बी. जाधव, दादासाहेब बच्चे व प्राध्यापक उपस्थित होते. नॅक समन्वयक डॉ. एस.एस. खोत यांनी स्वागत केले, तर प्रा. नितीन कळंत्रे यांनी आभार मानले.

.

फोटो ओळ... वारणानगर येथे जिल्हा कौशल्य, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांचा सत्कार करताना वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते झाला. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर आदी.

Web Title: District Skill Development Employment, Entrepreneurship Guidance