मेकॅनिकल बांधवांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST2021-06-02T04:19:28+5:302021-06-02T04:19:28+5:30

येथील महालक्ष्मी स्पेअर्सच्या वतीने कसबा तारळे व परिसरातील टू व्हीलर, फोर व्हीलर, इलेक्ट्रिकल मेकॅनिक बांधवांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात ...

Distribution of necessities to the mechanical brothers | मेकॅनिकल बांधवांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

मेकॅनिकल बांधवांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

येथील महालक्ष्मी स्पेअर्सच्या वतीने कसबा तारळे व परिसरातील टू व्हीलर, फोर व्हीलर, इलेक्ट्रिकल मेकॅनिक बांधवांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच संजयसिंह मोहिते होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. कडक निर्बंधामुळे अनेक उद्योग व्यवसाय पूर्णत: बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी स्पेअर्सचे मालक उत्तम हुजरे, ऋतुराज हुजरे यांनी कसबा तारळेसह परिसरातील पंचेचाळीसहून अधिक मेकॅनिकल बांधवांना गुडाळचे उपसरपंच दत्तात्रय कोथळकर, खिंडीव्हरवडेचे पो.पा. राजू पोवार, संजयसिंह मोहिते, माजी सरपंच उमेश पाटील, लखन साबळे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले

कार्यक्रमासाठी अशोक पाटील, सात्तापा चौगले, उत्तम चौगले, योगेश कुंभार, धनाजी शिवूडकर, नौशाद जमादार, भगवान बचाटे, उमेश मोहिते, उत्तम पाटील, सूरज साबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of necessities to the mechanical brothers