शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील विवाहसोहळ्यात मोबाईल लाईव्हद्वारे पडल्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या कचाट्यात अडकल्यामुळे नऊ महिन्यांपूर्वी ठरलेला विवाहसोहळा अखेर मोबाईल लाईव्हचा आधार घेत या महिन्यात पार पडला. ...

कोल्हापूर : कोरोनाच्या कचाट्यात अडकल्यामुळे नऊ महिन्यांपूर्वी ठरलेला विवाहसोहळा अखेर मोबाईल लाईव्हचा आधार घेत या महिन्यात पार पडला. कोल्हापूरचा मुलगा आणि पंढरपूरची मुलगी यांच्या अमेरिकेत पार पडलेल्या या अनोख्या विवाहसोहळ्यात महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच सहभागी झाली आणि नातेवाईक, मित्रमंडळींनी मोबार्ईल लाईव्हद्वारेच ऑनलाईन अक्षता टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोल्हापुरातील योगेश कुंभार यांचा मुलगा अभिषेक आणि पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता यांचा विवाह सर्वसंमतीने मार्च २०२० मध्ये निश्चित झाला होता. दोघेही उच्चशिक्षित आहेत. अभिषेक हा अमेरिकेतील एका कंपनीत नोकरी करतो. कोरोनाची परिस्थिती दूर झाल्यानंतर भारतात विवाह समारंभ करण्याचे ठरले. विवाहाचा शुभमुहूर्तही काढण्यात आला; परंतु कोरोनामुळे अभिषेकला भारतात जाण्याची परवानगी मिळाली नाही. विवाह निश्चित होऊन नऊ महिने उलटले तरी त्याला भारतात येण्याची परवानगी मिळाली नाही. अखेर दोन्हींकडच्या नातेवाइकांनी अमेरिकेतच जाण्याचे ठरवले.

सर्वांनी पासपोर्ट तयार केले आणि व्हिसा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत सर्वजण होते. मुहूर्त तर काढलेला, समारंभासाठी हॉलही ठरलेला होता. सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने पुन्हा खो बसल्याने सारेच हताश झाले. शेवटी वऱ्हाडी मंडळींशिवाय मुलीने एकटीनेच जाण्याचे ठरविले आणि विमानाने ती अमेरिकेत पोहोचली. सनईच्या निनादात आणि भटजींच्या मंगलाष्टकांनी ठरल्याप्रमाणे मोजक्याच मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत अखेर हे शुभमंगल निर्विघ्नपणे पार पडले. या अनोख्या विवाहसोहळ्यात महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या-त्यांच्या गावांतूनच सहभागी झाली आणि नातेवाइकांनी तसेच मित्रमंडळींनी मोबार्ईल लाईव्हद्वारेच अक्षता टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या.

----------------------------------------------------------------

फोटो : कोल्हापुरातील योगेश कुंभार यांचा मुलगा अभिषेक आणि पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता अमेरिकेत विवाहबद्ध झाले.

फोटो ओळ : 22042021-kol-online marrige

(बातमीदार : संदीप आडनाईक)

===Photopath===

220421\22kol_4_22042021_5.jpg

===Caption===

फोटो : कोल्हापूरातील योगेश कुंभार यांचा मुलगा अभिषेक आणि पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता अमेरिकेत विवाहबध्द झाले. फोटो ओळ : 22042021-kol-online marrige