दिनकर कांबळे यांनी घेतली महादेवराव महाडिक यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:25 IST2021-04-08T04:25:04+5:302021-04-08T04:25:04+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संघाचे माजी संचालक दिनकर कांबळे (भुदरगड) यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक ...

Dinkar Kamble met Mahadevrao Mahadik | दिनकर कांबळे यांनी घेतली महादेवराव महाडिक यांची भेट

दिनकर कांबळे यांनी घेतली महादेवराव महाडिक यांची भेट

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संघाचे माजी संचालक दिनकर कांबळे (भुदरगड) यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उमेदवारीची मागणीही त्यांच्याकडे केली.

‘गोकुळ’ची छाननी झाल्याने पॅनेल बांधणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्तारूढ व विरोधी पॅनेलमध्ये अंतर्गत घडामोडी सुरू असून, गाठीभेटींबरोबरच एकमेकांचा अंदाज घेऊन आपली बांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून माजी संचालक दिनकर कांबळे यांनी समर्थकांसह कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जाऊन महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘गोकुळ’ची उमेदवारी मिळावी, यासाठी माजी संचालक दिनकर कांबळे यांनी बुधवारी महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. यावेळी विश्वास जाधव आदी उपस्थित होते. (फोटो-०७०४२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Dinkar Kamble met Mahadevrao Mahadik