शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाहू हायस्कूलमधील साहित्य खरेदीबाबतच्या माहितीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST

विरोधी नगरसेवकांकडून चौकशीची मागणी इचलकरंजी : येथील शाहू हायस्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षात गणवेश वाटप व शॉर्ट फिल्मवर चौदा लाख ...

विरोधी नगरसेवकांकडून चौकशीची मागणी

इचलकरंजी : येथील शाहू हायस्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षात गणवेश वाटप व शॉर्ट फिल्मवर चौदा लाख १० हजार रुपये खर्च केले आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यामुळे विरोधी सदस्यांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन चौकशी व कारवाईची मागणी केली. मुख्याध्यापक व विभागप्रमुख यांच्या माहितीत तफावत आढळले असून, साहित्यही दर्जेदार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खळबळ उडाली. त्यावर नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शिक्षण आणि व्यवस्थापन समितीची ५ जुलैला बैठक घेऊन अनियमितता आढळल्यास कारवाईचे आश्वासन दिले.

नगरपालिकेच्या ३० जूनला झालेल्या सभेत शाहू हायस्कूलमधील ३१८ विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटप आणि शाळेशी निगडित शॉर्ट फिल्म बनविण्यासाठी चौदा लाख १० हजार रुपये खर्च केल्याचा विषय होता. या विषयावर चर्चा सुरू असताना विरोधी नगरसेवकांनी या कामांबाबत माहिती विचारली असता प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे शुक्रवारी नगरसेवक सागर चाळके, शशांक बावचकर आणि प्रकाश मोरबाळे यांनी नगराध्यक्षा स्वामी यांची भेट घेतली. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण समिती व विभागप्रमुख यांच्यासमक्ष गणवेश आणि शालेय साहित्य खरेदीबाबतच्या निविदा, त्याची कागदपत्रे याबाबत विचारणा केली. त्यामुळे खळबळ उडाली. मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी साहित्य वाटप केल्याचे सांगितले. तसेच खरेदीबाबत शिक्षण समितीकडे बोट केले. मात्र, मुख्याध्यापक आणि विभागप्रमुख यांच्यातील माहितीमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रत्यक्ष वितरण केलेल्या साहित्याचे नमुने मागवले. त्यामध्ये साहित्य हे दर्जेदार नसल्याचे स्पष्ट झाले.

कोणतीही निविदा अथवा आवश्यक प्रक्रिया न राबविता साहित्य खरेदी केल्याचे उघडकीस आले. विरोधी सदस्यांनी हे साहित्य नगराध्यक्ष कार्यालयात जमा करून घ्यावे व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी केली. त्यावर ५ जुलैला संयुक्त बैठक होणार आहे.

०२०७२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजीत शाहू हायस्कूलमधील शालेय साहित्य खरेदीत तफावत आढळल्याने साहित्य व दर्जा तपासणीसाठी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासमोर मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी साहित्य जमा केले.

०२०७२०२१-आयसीएच-०५

इचलकरंजीतील शाहू हायस्कूलमधील शालेय साहित्य खरेदीत तफावत आढळल्याने याबाबत संपूर्ण चौकशी करण्याची मागणी नगरसेवक सागर चाळके, शशांक बावचकर व प्रकाश मोरबाळे यांनी केली.