भारत बंद यशस्वी करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:55+5:302021-09-22T04:26:55+5:30

इचलकरंजी : शेतकरी व कामगारांविरोधात केलेले कायदे रद्द करा, ४ आचारसंहिता रद्द करा, महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, अशा ...

Determined to make India a success | भारत बंद यशस्वी करण्याचा निर्धार

भारत बंद यशस्वी करण्याचा निर्धार

इचलकरंजी : शेतकरी व कामगारांविरोधात केलेले कायदे रद्द करा, ४ आचारसंहिता रद्द करा, महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, अशा विविध मागण्यांसाठी २७ सप्टेंबरला संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार येथील समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. यावेळी माकप, भाकप, लाल निशाण, भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, सीआयटी, आयटक, इंटक, लाल निशाण, कामगार संघटना, वंचित आघाडी, रिपब्लिकन गटांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीस प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माकपचे ए.बी. पाटील, हणमंत लोहार, भरमा कांबळे, दत्ता माने आदींसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Determined to make India a success