शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी विचारवंतांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार

By admin | Updated: November 25, 2015 00:54 IST

संघर्ष यात्रांचा समारोप

कोल्हापूर : देशातील सांस्कृतिक बहुविविधता नष्ट करायचा प्रयत्न करणाऱ्या मूलतत्त्ववादी शक्तींचा आम्ही सर्व ताकदीनिशी प्रतिकार करू. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांचे वारसदार म्हणून त्यांचे कार्य आम्ही पुढे नेऊ. त्यासाठी जीवन समर्पित करू, अशी प्रतिज्ञा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथे केली. पुरोगामी विचारवंतांचे खूनसत्र थांबले पाहिजे. त्यांचे मारेकरी व सूत्रधारांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठीच्या संघर्ष यात्रांचा समारोप झाला. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनातर्फे आयोजित संघर्षयात्रा, आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनची ‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ संघर्षयात्रा सकाळी अकरा वाजता सागरमाळ येथे एकत्रित आल्या. येथे कॉ. पानसरे यांच्या निवासस्थानासमोर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी प्रतिज्ञा दिली. ‘लोकभूमी’ मासिकाच्या कॉ. पानसरे यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, उमा पानसरे, मेघा पानसरे, स्मिता पानसरे, बन्सी सातपुते, कॉ. भालचंद्र कानगो, भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, तुकाराम भस्मे, किशोर जाधव, एस. बी. पाटील, सुरेश शिपूरकर, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार, आदी उपस्थित होते. दरम्यान, ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ने २२ नोव्हेंबरपासून कॉ. पानसरे यांच्या जन्मभूमी कोल्हारपासून संघर्षयात्रा सुरू केली. तेथून ही यात्रा मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील ताराराणी चौकात आली. तिचे स्वागत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले. (प्रतिनिधी)