शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

खोळंबा अन् प्रवाशांचे हाल

By admin | Updated: December 19, 2015 01:06 IST

एस. टी. कर्मचारी आंदोलन : पोलिसांबरोबर शाब्दिक चकमक; दुपारनंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : राज्यातील महाराष्ट्र एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स, काँग्रेस (इंटक)च्या कामगारांचे गुरुवारपासून सुरु असलेले आंदोलन शासनाशी सकारात्मक चर्चा झाल्याने शुक्रवारी दुपारनंतर मागे घेण्यात आले. मात्र दुपारपर्यंत जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली. सकाळी सव्वाबाराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी बस रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देताच आंदोलक नरमले. ‘गांधीगिरी’ पद्धतीने चालकांना गुलाबपुष्प देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. अन्य महामंडळे व राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा ‘एस.टी’मध्ये अत्यंत कमी पगार आहे. कामगार करार २०१२-१६ रद्द करून एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सभासद गुरुवारी (दि. १७) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांतील चालक, वाहक, तांत्रिक या विभागांतील ७०० कर्मचारी काम बंद करून संपात सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आठपासून पुन्हा ‘इंटक’चे राज्याचे उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय सचिव आप्पासाहेब साळुंखे, विजय सणगर, रूपाली पाटील, सारिका पाटील, सुरेश गवळी, बजरंग चव्हाण, सुनंदा काळे, सारिका शिंदे, सयाजी घोरपडे, सुनंदा माने यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मारला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. साडेअकरा ते साडेबारा या वेळेत आंदोलकांनी काही बसेस अडविण्याचा प्रयत्न केला. त्वरित पोलिसांचा फौजफाटा आला. त्यांनी आंदोलकांना बाजूला करून बससेवा सुरळीत केली. आंदोलक आक्रमकपणे बस रोखण्यासाठी जात होते. त्यावेळी ‘काल ताब्यात घेऊन सोडून दिले होते, आज गुन्हा दाखल करतो,’ असा दम शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी काही काळ पोलीस अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेत शांततेने संप सुरू ठेवला. दरम्यान, बसवाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच फलाटांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. बससंबंधी विचारणा करण्यासाठी चौकशी कक्षात झुंंबड उडाली होती. प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत असल्याने एस.टी. प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. नाइलाजास्तव काही प्रवाशांनी खासगी वाहनांतून जाणे पसंत केले.