शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसास सापळा रचून पकडले

By admin | Updated: December 13, 2015 01:19 IST

किणीतील संशयितास अटक : शाहूपुरी जिमखाना येथे दोघांना लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोल्हापूर : क्राइम ब्रॅँचचा पोलीस असल्याची बतावणी करून किणी (ता. हातकणंगले)चा संशयित समीर इलाही अरब (वय ४०) याला शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक येथे पकडले. संशयित समीरने शुक्रवार (दि. ११) रात्री शिवाजी पार्कमधील शाहूपुरी जिमखानामध्ये दोघांना पकडून त्यांच्याकडील सात हजार ६०० रुपये व सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे १३ हजार ६०० रुपयांचा माल चोरून नेला होता. यापूर्वी समीर अरबवर २०१४ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे गुन्हा दाखल आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जयसिंगपूर येथील शिवाजी आयलू नेमाणे (२७, रा. नववी गल्ली, दुर्गामाता मंदिराजवळ, मूळ गाव कुलाळवाडी, ता. जत, जि. सांगली) हे व त्याचे मित्र शुक्रवारी रात्री कामानिमित्त एस. टी. बसने मध्यवर्ती बसस्थानक येथे आले होते. त्यावेळी ते वटेश्वर मंदिर येथून जात होते. त्यावेळी अंदाजे ३५ ते ४० वर्षांचा अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आला. त्याने ‘मी क्राइम ब्रँचचा पोलीस आहे’ असे सांगून त्याने ‘महाराष्ट्र पोलीस’ असलेले किचन व शिट्टी त्यांना दाखविली. ‘तुमच्याकडे चोरीचे दागिने आहेत,’ असे सांगून नेमाणे व त्यांच्या मित्राला शिवाजी पार्क येथील शाहूपुरी जिमखाना मैदानाजवळ नेले. तेथे या दोघांकडील सात हजार ६०० रुपये व मोबाईल असा माल घेऊन तो निघून गेला. यानंतर शिवाजी नेमाणे व त्यांचे मित्र पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना हा घडलेला प्रकार कथन करून शिवाजी नेमाणे यांनी फिर्याद दिली. ं यानंतर पोलिसांनी अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्हेगारांच्या छायाचित्रांचा अल्बम त्यांना दाखविला. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्राने समीरला ओळखले. त्यानुसार शनिवारी रात्री गुन्हे शोध पथकाने (डी.बी.) मध्यवर्ती बसस्थानक येथे सापळा रचला. त्यावेळी संशयित समीर अरब हा दुसरे सावज शोधत असताना पोलिसांनी त्याला पकडले. याप्रकरणी संशयित समीर अरब याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम ३९२ नुसार ‘जबरी चोरी’ व १७० नुसार (तोतया पोलीस) असा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.