बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:30 IST2021-08-17T04:30:33+5:302021-08-17T04:30:33+5:30

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नेसरी विभागातील बैलगाडी चालक-मालक संघटनेतर्फे करण्यात आली. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय ...

Demand for resumption of bullock cart race | बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नेसरी विभागातील बैलगाडी चालक-मालक संघटनेतर्फे करण्यात आली. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा युवा सेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांना निवेदन देण्यात आले.

युवा सेना पदाधिकारी नियुक्तीच्या चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या मुलाखतीनिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व युवासेना विस्तारक कोल्हापूर डॉ. सतीश नरसिंग नेसरी येथे आले होते. यावेळी नेसरी शिवसेनेमार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नेसरी विभागातील बैलगाडी चालक-मालक संघटनेतर्फे बैलगाडी शर्यत सुरू व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी उपतालुकाप्रमुख विलास हल्याळी, नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मुरकुटे, भागेश पांडव, प्रमोद मुरकुटे, सौरभ गंगली, प्रशांत मुरकुटे, दिगंबर तेजम, आकाश हल्याळी, श्रीहरी भोपळे, सचिन नाईक, अक्षय डवरी, कैफ दड्डीकर आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for resumption of bullock cart race