शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या प्रदर्शनात ‘कोल्हापुरी’ला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 00:55 IST

महालक्ष्मी सरस प्रदर्शन : जिल्ह्यातील बारा महिला बचत गट सहभागी होणार

कोल्हापूर : मुंबई येथे होणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १२ महिला बचत गट सहभागी होणार आहेत. आतापर्यंतच्या सर्वच प्रदर्शनांमध्ये कोल्हापुरी खाद्यपदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील म्हाडा कॉम्प्लेक्स वांद्रे येथे ११ ते २३ जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन भरणार असून, प्रत्येक गटाच्या दोन, याप्रमाणे २४ महिला सहभागी होतील. या महिलांना येण्या-जाण्याचे भाडे शासनाच्यावतीने देण्यात येते. येथे स्टॉल मोफत असून महिलांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात येते. दहा-बारा दिवस राहणे शक्य नसेल तर बचत गटांच्या उर्वरित महिलांनाही सहभागी करून घेतले जाते. कोल्हापूर जिल्ह्णातील जयभवानी (पणुंद्रे, ता. शाहूवाडी), भूमी (कसबा वाळवे, ता. राधानगरी), महालक्ष्मी, जय मातादी (हुपरी), कल्याणी (भादोले, ता. हातकणंगले), पंचगंगा (वळिवडे), भोगावती, तुळशी (खुपिरे), सिद्धार्थ (उचगाव, ता. करवीर), उमेद (औरवाड, ता. शिरोळ), गुरूदत्त (कोतोली), श्री गणेश (वाघवे, ता. पन्हाळा) हे बचत गट सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी) दिल्लीपासून ते कोल्हापूरपर्यंतच्या अनेक प्रदर्शनांमध्ये कोल्हापुरी खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. कोल्हापुरी तांबडा, पांढरा रस्सा, गूळ, चटण्या, मसाले, हुपरीचे चांदीचे दागिने, कोल्हापुरी चप्पल, यासाठी नागरिक कोल्हापूरच्या बचत गटांच्या स्टॉलसमोर गर्दी करतात. पुणे, मुंबई येथे तर मूळचे कोल्हापूर परिसरातील अनेकजण या स्टॉलवर येत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. बचत गटांच्या महिलाही आता जागरूक झाल्या असून, त्यांचे व्यवसाय व्यवस्थापन अतिशय नेटके असल्याचा अनुभव आम्ही घेत असतो. - डॉ. हरीष जगताप, प्रकल्प संचालक, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.