शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वाशी येथील मूर्ती बदलण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

सडोली (खालसा) : वज्रलेपावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वाशी (ता. करवीर) येथील लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या बिरदेवाच्या नवीन मूर्तीची ...

सडोली (खालसा) : वज्रलेपावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वाशी (ता. करवीर) येथील लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या बिरदेवाच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय देवस्थान समिती, ग्रामस्थांनी घेतला असून मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लोकमतने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन जळ यात्रेच्या पूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले होत आहे.

लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी येथील बिरदेव देवाच्या मूर्तीस वज्रलेप करण्यात आला होता. जुनी मूर्ती व नवीन मूर्तीत साम्य नसल्याने मूर्तीचे रुप बदल्याने केलेला वज्रलेप वादाच्या भोवऱ्यात सापडला. वज्रलेप करीत असताना शासकीय परवानगी अथवा तज्ज्ञांची समिती नियुक्त न करता हा निर्णय घेतल्याने अडचणीत भर पडली होती. बिरदेवाच्या जुन्या मूर्तीप्रमाणे नवीन मूर्तीत बदल करावा अशी मागणी ग्रामस्थ व भाविक करीत होते.

मायाक्का देवीचे चिंचणी या देवीच्या संरक्षणासाठी बिरदेवाने विठ्ठलाच्या सहकार्याने कर्नाटकात अत्याचार करीत माजलेल्या गजलिंग आणि रेदेसूर या दोन्ही महाबलाढ्य दैत्यांच्या वध (संहार) केला. त्या युध्दाचे प्रतीक असलेले उजव्या हातातील हत्यार व डाव्या हातातील ढाल ही चिन्हे आहेत. परंतु मूर्तीवर वज्रलेप करीत असताना अनेक त्रुटी राहिल्याने देवाच्या हातातील खंजीर, ढाल, कपाळावरील गंध, डोळे, मिशा, डोक्यावरील टोप यामध्ये जुन्या व नवीन मूर्तीत साम्य नसल्याने भाविकात व ग्रामस्थांतून केलेल्या वज्रलेपास विरोध केला होता. वज्रलेप करीत असताना शासनाची अथवा धर्मादाय आयुक्तांची, पुरातत्व विभागाची कागदपत्रांच्या कटकटीतून सुटका मिळवण्यासाठी गडबडीने निर्णय घेतल्याने लाखो भाविकांच्या भावनेशी खेळ खेळल्याने ग्रामस्थांसह भाविकामध्ये खळबळ उडाली होती.

यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्यानेे नाराजीचे सूर उमटत होते. यासंदर्भात लोकमतमध्येे वृत्त प्रसिद्ध होताच देवस्थान समिती जागी झाली व ग्रामस्थ व धनगर समाज एकत्र येऊन नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. लोकवर्गणीतून या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया

बिरदेवाच्या मूर्तीवर चुकीच्या पद्धतीने वज्रलेप झाल्याने मूर्तीमध्ये साम्य नसल्याने ही जुनी मूर्ती बदलण्यासाठी ग्रामस्थ व धनगर समाजातील लोकांच्या बैठका पार पडल्या. नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. - बबन रानगे, सरसेनापती मल्हार सेना

ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने मूर्ती बदलण्यात येणार असून येत्या जळ यात्रेपूर्वी नवीन मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येईल.

- लक्ष्मण पुजारी , माजी अध्यक्ष बिरदेव देवालय ट्रस्ट