शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रियकराचा मृत्यू

By admin | Updated: November 12, 2014 00:40 IST

कसबा बावड्यातील घटना : महिलेची प्रकृतीही चिंताजनक

कोल्हापूर : घरगुती भांडणातून विष प्राशन केलेल्या प्रेमीयुगुलापैकी तरुणाचा आज, मंगळवारी पहाटे सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विक्रम मोहन कोरे (वय २६, रा. चौगुले गल्ली, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या प्रेयसी महिलेची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुपारी चारच्या सुमारास कसबा बावडा येथील स्मशानभूमीमध्ये विक्रमवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. विक्रम कोरे याने विष प्राशन केल्याने त्यापाठोपाठ त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेनेही सीपीआरमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दोघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना विक्रमचा आज पहाटे मृत्यू झाला. विक्रमचे वडील मोहन कोरे यांचा सरबत विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायात तो त्यांना मदत करत होता. कधी-कधी तो रिक्षाही चालवत होता. त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या त्या महिलेशी त्याचे सूत जुळले. त्यानंतर त्या महिलेने पतीला घटस्फोट देऊन ती त्याच्यासोबत राहू लागली. गेली चार वर्षे ते दोघे एकत्र राहत होते. संबंधित महिला शिरोळ कारखाना, गणेशनगर येथील आहे. काल, सोमवारी सकाळी त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. यातून विक्रमने विष प्राशन केल्यानंतर त्याला तिने सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तिने शिल्लक राहिलेल्या बाटलीतील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गोंधळ उडाला होता. आज पहाटे उपचार सुरू असताना विक्रमचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये गर्दी केली होती. दुपारी चारच्या दरम्यान त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, ‘त्या’ महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्या सेवेला कोणीच नाही. सीपीआरचे कर्मचारीच तिची सेवा करत आहेत. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)