गुंडांना ‘मोक्का’सह हद्दपार करा

By Admin | Updated: July 7, 2015 01:10 IST2015-07-07T01:10:29+5:302015-07-07T01:10:29+5:30

जिल्हा पोलीसप्रमुख

Deal the goons with 'Malka' | गुंडांना ‘मोक्का’सह हद्दपार करा

गुंडांना ‘मोक्का’सह हद्दपार करा

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘मोक्का’सह हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सोमवारी क्राईम बैठकीत दिले.
पोलिसांच्या कामाच्या आढाव्यासंदर्भात सोमवारी पोलीस मुख्यालयात क्राईम बैठक झाली. यावेळी जिल्ह्यात घरफोड्या, चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडत आहेत. त्या रोखण्यासाठी रस्त्यावर रात्रगस्तीसह पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे, तसेच आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काही गुन्हेगार निवडणूक लढविण्यामध्ये सक्रिय असल्याचे समजते. त्यासाठी ते आतापासून आपल्या नावाचा गाजावाजा करत आहेत. या गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मटका, जुगार व खासगी सावकार यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळ््यांवर मोक्का व हद्दपारीसारख्या गंभीर कारवाईचे आदेश डॉ. शर्मा यांनी बैठकीत दिले.

Web Title: Deal the goons with 'Malka'