शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाडचे ग्रामीण रुग्णालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By admin | Updated: November 14, 2014 23:33 IST

रुग्णांची हेळसांड : जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर रुग्णांच्या आशा पल्लवीत

गणपती कोळी -- कुरूंदवाड --दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामीण रुग्णालय दत्तवाडसह परिसरातील सुमारे पंचवीसहून अधिक गावांतील रुग्णांना आधार बनले आहे. मात्र, आरोग्य विभागातील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा, उपचारास टाळाटाळ, औषधांचा तुटवडा, आदी कारणांमुळे रुग्णांची हेळसांड होत असून, सर्वसोयींनीयुक्त असणारे रुग्णालय रुग्णांसाठी मात्र ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी या रुग्णालयाला अचानक भेट देऊन वस्तुस्थिती पाहून गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सुलभ सेवा मिळावी, या उद्देशाने शिरोळ तालुक्यात शिरोळ व दत्तवाड या दोन गावांमध्ये सर्वसोयी असलेले ग्रामीण रुग्णालय उभारले. १९८१ पासून तीस खाटांची सेवा देणारे जिल्ह्यातील हे पहिलेच रुग्णालय आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात परिसरातील सुमारे पंचवीसहून अधिक गावांतील रुग्ण सेवा घेतात. औषधे, प्रयोगशाळा (रक्त, लघवी तपासणी), आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधे, दंत चिकित्सा विभाग, नेत्र विभाग, सोनोग्राफी, आॅपरेशन थिएटर अशा सर्व विभागांची स्वतंत्र कार्यालये असलेले टोलेजंग रुग्णालय आहे.वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, लिपिक असे कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेविका, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, सहायक, अशी पदे रिक्त आहेत. सेवेत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असला तरी रुग्णालय अधीक्षक डॉ. जाधव यांच्या वारंवार असणाऱ्या अनुपस्थितीमुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे बेशिस्तपणा वाढतच गेला. या सुविधांकडे आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने औषधांचा तुटवडा, सेवेत असणाऱ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्यामुळे जबाबदारी टाळणे यामुळे रुग्णांची हेळसांडच होत आहे. वैद्यकीय अधिकारी, तसेच दिली जाणारी सेवा याबाबत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख बाळासो कोकणे यांनी आंदोलन करून लक्ष वेधले, तरी याची गंभीर दखल घेतलीच नाही. त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे. ग्रामस्थ, आंदोलनकर्ते यांच्या वारंवार तक्रारींमुळे जिल्हाधिकारी माने यांनी अचानक रुग्णालयाला भेट दिल्याने वस्तुस्थिती स्पष्ट झाली. रुग्णालयातील अवस्था पाहून जिल्हाधिकारी माने यांनी तहसीलदार सचिन गिरी यांना अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.