शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे उपनिरीक्षक दादू मुल्ला बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

(जिल्हा बँक लोगो) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अडकूर (ता. चंदगड) येथील अडकूर विकास संस्थेत डिसेंबर २०१८ मध्ये सचिव ...

(जिल्हा बँक लोगो)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अडकूर (ता. चंदगड) येथील अडकूर विकास संस्थेत डिसेंबर २०१८ मध्ये सचिव व लिपिकाने बोगस रेकॉर्डद्वारे लाखो रुपयांचा अपहार केला होता. बँकेचे उपनिरीक्षक असतानाही या अपहाराकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत बँकेने दादू हसन मुल्ला यांना अखेर बडतर्फ केले.

अडकूर विकास संस्थेचे सचिव व लिपिकाने बोगस सभासदांचे नावे रक्कम उचल क,न लाखो रुपयांचा अपहार केला होता. वास्तविक पीककर्जासह इतर कर्जपुरवठा करताना जिल्हा बँकेचे निरीक्षक त्याच्या कागदपत्रांची तपासणी करतात. त्यानंतर मंजुरी दिली जाते. या संस्थेचे उपनिरीक्षक दादू मुल्ला यांनी संस्थेत बोगस कागदपत्रांच्या आधारे अपहार होत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत बँकेने त्यांच्यावर डिसेंबर २०१८ मध्ये निलंबनाची कारवाई केली होती. मुल्ला यांच्या निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळे बँकेला आर्थिक तोषीस लागल्याने २४ डिसेंबर २०१८ ला त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश कार्यकारी समितीने दिले. चाैकशीमध्ये मुल्ला यांच्या निष्काळजीपणामुळेच अपहार करण्यास मदत झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बँकेच्या शिस्तीस बाधा आणणारे वर्तन केल्याने त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.

अपहारानंतर अडीच वर्षांनी कारवाई

अडकूर संस्थेत डिसेंबर २०१८ मध्ये अपहार झाला होता. त्यांनतर मुल्ला यांना निलंबित केले असले तरी मुल्ला यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश मे २०१९ ला देण्यात आले. त्यानंतर मार्च २०२० मध्ये खातेनिहाय चौकशी पूर्ण होऊन सप्टेंबर २०२० ला अहवाल बँकेकडे सादर केला आणि आता बडतर्फची कारवाई केली. अपहारानंतर अडीच वर्षांनी कारवाई झाली.